शरीराच्या तापमानाप्रमाणे पाणी पिणे हे योग्य प्रकारे पाणी पिण्याची पद्धत आहे. म्हणजेच एक वेळ तुम्ही थोडं जास्त गरम पाणी प्यायले तर हरकत नाही पण थंड पाणी पिऊ नये. त्यातला मध्य म्हणजे कोमट पाणी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यविषयक अनेक फायदे होतात.
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिल्याने पोटातील गॅस आणि पित्ताचा त्रास कमी होतो. शरीर निरोगी राहते तसेच आतड्यांचे आकुंचन होण्यास मदत होते. त्यामुळे आपले पोट निट साफ होते
- सुंदर त्वचा मिळवण्यासाठी पाणी पिताना ते कोमट पाणी पिणे सुरु करा गरम देखील चालेल. यामुळे तुमच्या त्वचेसंदर्भातील अनेक समस्या दूर होतील आणि आणि त्वचा नितळ होईल .
- मासिकपाळी दरम्यान कोमट पाणी प्यायल्याने या काळात होणाऱ्या वेदना कमी होतात.
- कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवी बाहेर पडते आणि किडनीवर कमी दबाव पडतो आणि किडनी निरोगी राहते.
- दिवसातुन दोन वेळा कोमट पाणी प्यायल्याने तुम्ही पोटाच्या समस्यांपासुन दूर राहू शकता. सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातुन सर्व विषारी तत्त्व लघवी वाटे बाहेर जातात.
- संधीवात असणा-या लोकांनी गरम पाणी पिणे एखाद्या औषधी प्रमाणे आहे. नियमित गरम पाणी प्यायल्याने हाडांच्या समस्या कमी होतात
- वजन कमी करण्यात देखील गरम पाणी मदत करते. जेवणाच्या एक तासानंतर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते. जर कोमट पाण्यात लिंबू आणि मधाचे काही थेंब मिळवून प्यायले तर वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.
- एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू मिळवून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमीन सी मिळते. गरम पाणी लिंबूचे कॉम्बिनेशन शरीराच्या इम्यूनिटीला मजबूत करते.
- रोज सकाळी गरम पाणी पिल्याने डोकेदुखीचा कमी होतो. शरीरामध्ये पुरेसे पाणी नसल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो त्यामुळे भरपूर पाणी प्या