Broadband Plan : स्वस्तात मस्त ब्रॉडबँड प्लॅन्स मध्ये 200Mbps ची स्पीड आणि बरंच काही


Internet Plans : आजकाल सर्वजण ब्रॉडबँड प्लॅन्स विकत घेत आहेत. त्यामुळे जिओ, एअरटेल, बीएसएनएल असे विविध नेटवर्क प्रोव्हायडर वेगवेगळे प्लॅन्स घेऊन येत आहेत.

Bradband Providers new plans प्लॅन्स

Affordable Brodband Plan : आजकाल घरोघरी ब्रॉडबँड कनेक्शन बसवली जात आहेत. घरातील सर्वांचे स्मार्टफोन, स्मार्टटीव्ही आणि कामासाठी लॅपटॉप कम्प्युटर सारकाही या एकाच कनेक्शनवर चालत आहे. त्यामुळे जिओ, एअरटेल, बीएसएनएल असे विविध नेटवर्क प्रोव्हायडर वेगवेगळे प्लॅन्स घेऊन येत आहेत. आता अशामध्ये जर तुम्ही एखादी परवडणारी ब्रॉडबँड प्लॅन स्कीम पाहत असाल तर अशाच काही प्लॅन्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये ९९९ रुपयांमध्ये ३३०० जीबी डेटा तेही 200Mbps च्या स्पीडने मिळणार आहे. सोबत ओटीटी कनेक्शनही मिळणार असून या प्लॅनबद्दल जाणून घेऊ..

जिओ फायबरचा ९९९ वाला प्लॅन

तर जिओ कंपनी या प्लॅनमध्ये ३,३०० जीबी डेटा वापरण्यासाठी देते. 150Mbps स्पीड या प्लॅनमध्ये मिळणार आहे. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग या प्लॅनमध्ये आहे. याशिवाय अॅमझॉन प्राईम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार, वूट सिलेक्ट, सोनी लिव्ह आणि जी5 असे खास ओटीटी सबस्क्रिब्शनही मिळणार आहेत.

5 Best Work From Home : आता ऑनलाईन घरबसल्या कमवू शकता पैसे, डॉलर्समध्ये कराल कमाई

एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लॅन्स

ज्यांना हायस्पीड इंटरनेट वापरायच त्यांच्यासाठी हा प्लॅन अगदी खास आहे. यात तब्बल 200Mbps स्पीड दिलं जाणार अूनन इंटरनेटसाठी ३३०० जीबी डेटा देण्यात आला आहे. यातही अनलिमिटेड कॉलिंग दिलं जाईल तसंच डिज्नी प्लस हॉटस्टर, अॅमेझॉन प्राईमचंही सबक्रिप्शन दिलं आहे.

बीएसएनएल ९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन्स

बीएसएनएल कंपनीचं नेटवर्क देखील हाय स्पीड आहे. एक जुनी नेटवर्क कंपनी म्हणून प्रसिद्ध बीएसएनएल चा ९९९ चा प्लॅनही तसा भारी आहे. यामध्ये तब्बल २टीबी म्हणजेच २००० जीबी डेटा देण्यात आला आहे. यातही डिज्नी हॉटस्टार आणि लायन्सगेटसह इतरही काही ओटीटी अॅपचं सब्सक्रिब्शन दिलं गेलं आहे.

Leave a Reply