जेव्हा कधी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचा उल्लेख येतो, तेव्हा दिवंगत राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, विजय केडिया, आशिष कोचलिया आणि डॉली खन्ना यांच्यासह अनेक बड्या गुंतवणूकदारांची नावे लोकांच्या समोर येतात. पण भारतात अनेक तरुण गुंतवणूकदारांनीसुद्धा शेअर बाजारातून लाखोंनी पैसा कमावला आहे.
Success Story of 100Cr at age 24: १२ वी पास मुलगा अवघ्या २४व्या वर्षी १०० कोटी-संकर्ष चंदा यांचे कोट्याधीश यादीत नाव: तरुण वयातील नवीन गुंतवणूकदारांमध्ये आता या एका २४ वर्षीय मुलाचे नाव सामील झाले आहे, ज्याने कॉलेजला जाण्याच्या वयात शेअर बाजाराचा मार्ग स्वीकारला आणि तो आता कोट्यधीश झाला.
शेअर बाजार हा एक उत्तम पर्याय
जेव्हा कधी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचा उल्लेख येतो, तेव्हा दिवंगत राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, विजय केडिया, आशिष कोचलिया आणि डॉली खन्ना यांच्यासह अनेक बड्या गुंतवणूकदारांची नावे लोकांच्या समोर येतात. पण भारतात अनेक तरुण गुंतवणूकदारांनीसुद्धा शेअर बाजारातून लाखोंनी पैसा कमावला आहे.
लोकांना कदाचित तरुण वयातील नवीन गुंतवणूकदारांबद्दल माहिती नसेल, आता या यादीत एका २४ वर्षीय मुलाचे नाव सामील झाले आहे, तो म्हणजे हैदराबाद येथील संकर्ष चंदा. ज्याने कॉलेजला जाण्याच्या वयात शेअर बाजाराचा मार्ग स्वीकारला आणि तो कोट्यधीश झाला.
संकर्ष चंदा (हैदराबाद)
हैदराबाद येथील संकर्ष चंदा यानी केवळ १७व्या वर्षाचा असताना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी संकर्षने शेअर मार्केटमधून १०० कोटी रुपये कमावले. खरं तर हे खूपच आश्चर्यचकित करणारे आहे, कारण बहुतेक गुंतवणूकदार आणि व्यापारी सुरुवातीला शेअर बाजारात पैसे गमावतात. संकर्षने शेअर बाजारातून करोडोंची कमाई करण्यासाठी कसा प्रयोग केला ते जाणून घेऊत.
Success Story of 100Cr at age 24: १२ वी पास मुलगा अवघ्या २४व्या वर्षी १०० कोटी-संकर्ष चंदा यांचे कोट्याधीश यादीत नाव
२००० रुपयांची गुंतवणूक
- संकर्षने २०१६ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
- यादरम्यान तो बेनेट युनिव्हर्सिटी (ग्रेटर नोएडा) मधून बीटेक कॉम्प्युटर सायन्सचा (BTech Computer Science)अभ्यास करीत होता, परंतु शेअर बाजारातील आवडीमुळे त्याने अभ्यास सोडला.
- संकर्षने अवघ्या २००० रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
- एका मुलाखतीत संकर्ष म्हणतो, “मी २ वर्षात शेअर बाजारात सुमारे १.५ लाख रुपये गुंतवले
- आणि २ वर्षांच्या कालावधीत माझ्या शेअर्सचे बाजार मूल्य १३ लाख रुपये झाले.”
गुंतवणुक ते कंपनी
संकर्ष केवळ शेअर बाजारामध्येच गुंतवणूक करत नाही तर, तो SAVART महणजेच Svobodha Infinity Investment Advisors Private Limited नावाच्या फिनटेक स्टार्टअपचा संस्थापक देखील आहे.
त्याचे फिनटेक स्टार्टअप लोकांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते.
- फिनटेक स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्याने २०१७ मध्ये ८ लाख रुपयांना शेअर्स विकले.
- आणि तो स्टार्टअपद्वारे कमावलेले पैसे पुन्हा गुंतवत राहिला आणि भरपूर नफा कमावला.
- संकर्षने द वीकेंड लीडरला सांगितले की, “माझी एकूण संपत्ती आता १०० कोटी आहे.” हे माझ्या शेअर बाजारातील गुंतवणुकीव्यतिरिक्त माझ्या कंपनीच्या मूल्यांकनावर अवलंबून आहे.
– Warren Buffett
- कधीही एका इन्कम सोर्सवर (उत्पन्नाच्या स्रोतावर) अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणूक करा आणि दुसरे इन्कम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
- किंमत जी तुम्ही देता, मूल्य जे तुम्हाला मिळते.
- THE LIFE, LESSONS & RULES OF SUCCESS – Warren Buffet Book
“फादर ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग” म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ बेंजामिन ग्रॅहम यांचा लेख वाचून वयाच्या १४व्या वर्षी संकर्षला शेअर बाजारात आवड निर्माण झाली आणि आज तो कोट्यधीश बनला.
हे सुद्धा वाचा :-