काळे मनुके खा आणि हे फायदे मिळवा
द्राक्षे जेव्हा विशेष पद्धतीने सुकवली जातात तेव्हा त्यांना मनुके म्हणतात. द्राक्ष्याचे जवळजवळ सर्वच गुण मनुक्यात असतात. आयुर्वेदात मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे. काळी व हिरवी अशा दोन प्रकारची द्राक्षे असतात. यापैकी काळ्या द्राक्षांमध्ये औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. या काळ्या मनुकांचे आरोग्यविषयक फायदे आपण पाहणार आहोत.

- काळे मनुका रात्री पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात कुस्करून त्यामध्ये जिरेपूड टाकावी व हे मिश्रण मनुक्यासह हळूहळू प्यावे. यातील तंतूमय घटकांमुळे पोट साफ मदत होते. तसेच यामुळे मलावरोध, बद्धकोष्ठता हे विकार दूर होतात.
- मनुकांच्या सेवनाने शरीरामध्ये होणाऱ्या चयापचय प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे ग्लुकोजची गरज मिळते.
- शरीराचा आग, दाह होत असल्यास काळे मनुके व ज्येष्ठमध रात्री भिजत घालावे. सकाळी उकळून ते पाणी प्यावे. शरीराची दाह कमी होते. तसेच मनुका आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याने शरीरात होणारा दाह कमी होतो.
- अर्धशिशीचा त्रास होत आल्यास काळे मनुके व धणे रात्री थंड पाण्यात भिजत घालून सकाळी हे पाणी प्यायल्याने अर्धशिशीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- आम्लपित्त, अपचन, ढेकर येणे अश्या समस्यांमध्ये मनुकांचे सेवन उपयुक्त ठरते. काळ्या मनुकांच्या सेवनाने मूतखडा, लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना व जळजळ यावर गुणकारी ठरतात.
नाचणी
नाचणी हे तृणधान्य पचण्यासाठी अत्यंत हलके आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध मंडळी व आजारातून उठलेल्या व्यक्तींसाठी ते अगदी फायद्याचे आहे.
- पण ज्यांना तब्येत बनवायची आहे, मासंवर्धन करायचे आहे. अशांना नाचणीचा तितकासा उपयोग होत नाही.
- पण, तरीही नाचणीमध्ये एक वैशिष्ट्य आहे ती शरीराला काटकपणा आणते.
- जसा गहू बलवर्धक, ज्वारी बुद्धिवर्धक तशी नाचणी ही शरीराला सडसडीतपणा आणणारी आहे.
- ज्यांना अंगावर अतिरिक्त चरबी नको आहे अशांनी नाचणीची भाकरी व ताक एका वेळच्या जेवणात ठेवावे कुठलाही थकवा न जाणवता मेद कमी होण्यास निश्चित मदत होते.
- 100 ग्रॅम नाचणीत तब्बल 344 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.
- ही नाचणी वाढीच्या मुलांना व गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना देण्यात येते.
- आपण नाचणीची पेज, खीर, खांडवी असे पदार्थ तयार करू शकतो.
- मैदा वापरून तयार करण्यात आलेली बिस्किटे देण्यापेक्षा मुलांना साजूक तुपातील नाचणीची बिस्किटे किंवा शंकरपाळे करून द्यावेत.
- नेहमीच्या घावन, धिरडं, थालीपिठात थोडे नाचणीचे पीठ घातल्यास कॅल्शियमचा नक्कीच फायदा मिळू शकतो.
Kid’s diet : जर तुम्हाला तुमच्या चिमुकल्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यांच्या ताटात या 5 गोष्टींचा समावेश करा
- जे वयोवृद्ध आहेत अशा लोकांसाठी नाचणी पेज हे अमृतासमान आहे.
- ज्यांना पोटाच्या संबंधित काही तक्रारी असतील, पचनाचे जुने विकार असतील, आशांनी आहारामध्ये ज्वारी-बाजरी, गव्हापेक्षा नाचणी व तांदळाचा वापर करावा.
- मधुमेहींनी सुद्धा तांदळा ऐवजी नाचणी व दालचिनी मिश्रित ताकाचा वापर केल्यास फायद्याचे ठरेल.
- नाचणीमध्ये कॅल्शियम आणि खनिजद्रव्य हाडे आणि दातांच्या वाढीसाठी बळकटीकरणासाठी आणि मजबुतीसाठी कायम ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
- विशेष करून मध्यमवयीन आणि वयस्कर स्त्री-पुरुषांमध्ये हाडासंदर्भात हाडांचा ठिसूळपणा गुडघेदुखी जास्त प्रमाणामध्ये आढळून येते याचे मुख्य कारण म्हणजे खनिज द्रव्यांचा अभाव असणे. त्यांनी आहारामध्ये नाचणी समाविष्ट करावी.
- नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. नाचणीतील तंतुमय पदार्थाचे प्रमाण इतर कडधान्यांच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त आहे.
- तंतुमय पदार्थ जास्त असल्या कारणाने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे.
- ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत आणि त्यामुळे रक्तशर्करेवरचे नियंत्रण राहते.
- तंतुमय पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलवर सुद्धा नियंत्रण ठेवतात.
- तंतुमय पदार्थाचे सेवन बद्धकोष्ठता होऊ देत नाही आणि बद्धकोष्टताची तक्रार असेल तर ती दूर करण्यास मदत करतात.