Dr. B.R. Ambedkar Jayanti २०२३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार


Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी म्हणजेच आज भारतासह जगभरात साजरी केली जाते.

Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान नेते आणि युगपुरुष होते. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर ची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी म्हणजेच आज भारतासह जगभरात साजरी केली जाते. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा करते. आज Dr. B.R. Ambedkar यांची 132 वी जयंती आहे.

Bhim Jayanti 2023 : १८ हजार वह्यांतून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

  • मी प्रथम आणि अंतिमत: भारतीय आहे.
  •  मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.
  • आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.
  • बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी अंतिम ध्येय असले पाहिजे.
  •  कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजावी.
  • अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो. 
  • शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
  • धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही. 
  • माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.
  •  तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

Dr. B.R. Ambedkar जयंतीचा इतिहास

14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.

Dr. B.R. Ambedkar दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. डॉ भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply