Arthritis treatment:चला तर माहिती करून घेऊ सांधेदुखीवर घरगुती उपाय

arthritis\rheumatoid arthritis\arthritis treatment\knee arthritis\rheumatoid arthritis treatment\psoriatic arthritis\arthritis (disease or medical condition)\arthritis pain\hand arthritis\arthritis in hands\arthritis society\arthritis foods to avoid\worst foods for arthritis\foods to avoid for arthritis\rheumatoid arthritis causes\rheumatoid arthritis symptoms\#arthritis\arthritis diet\management of rheumatoid arthritis\gouty arthritis

सांधेदुखीवर घरगुती उपाय
वाढत्या वयानुसार सांधेदुखी चा त्रास वाढायला लागतो. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो.

●सामान्य लक्षणे

काम किंवा हालचाल करताना सांधे दुखणे, सांध्यावर सूज येणे, सकाळी उठल्यावर सांधे दुखने, विशेषतः हात पायाची बोटे जखडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

https://marathidisha.com/ayurvedic-salts-benefits/

●सांधेदुखी मध्ये काय खावे

गहू, तांदूळ, दुधी, दोडका, घोसाळे, तूर, मूग कुळीथ, द्राक्षे, कोहळा, दूध, तूप, लोणी, आले, लसूण, गरम पाणी इत्यादी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे.

●काय खाऊ नये

वरई, नाचणी, चवळी, वाल, पावटे, कारले, कैरी, कच्चा टोमॅटो, आंबट दही, चिंच, इडली, वैगैरे आंबवलेले पदार्थ खाण्याचे टाळावे.

  • सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राही पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल.
  • दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंदमुळाची भरड चार कप पाण्यात उकळावे व एक कप पाणी राहिल्यावर गळून घ्यावे. व पिऊन घ्यावे. हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखी मध्ये निश्चित आराम मिडेल. याशिवाय याने परसाकडे साफ होऊन संध्यावरील सूज कमी होऊन वेदना कमी होतात.
  • निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होतात.
  • जर सांधा दुखत असेल तर मूठभर ओवा एरंडेल तलावर गरम करून सुटी कापडात बांधून पुरचुंडी करावी व त्याने दुखाणार सांधा शेकावा.
  • सांधा सुजला असेल व वेदना होत असतील तर सूज व वेदना कमी करण्यासाठी एरंडची पाने वाफवून कुटून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावे.
  • रोजची कनिक मळताना चमचाभर एरंड तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलका खावा. याने सांधेदुखीचा व सर्व सांधे संबंधित समस्या दूर होतात.
  • अशक्तपणा मुले सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो.
  • रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, वजन जास्त असल्यास कमी करावे, नियमित योगासने करावी, व सकाळी चालायला जावे. असे केल्यास सांधे दुखीचा त्रास होत नाही.
  • तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नेहन होऊन सांधेदुखी कमी होते.

Leave a Reply