Asus Vivobook : भारतात लाँच केले ८ नवे लॅपटॉप, प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी खास,


Asus New Laptop : असूस कंपनीने Asus 2023 Vivobook series या सिरीजतंर्गत ८ लॅपटॉप्स यंदा लाँच केले आहेत. Asus ची आईसकूल टेक्नोलॉजी आणि इतर दमदार फीचर्स या लॅपटॉप्समध्ये आहेत.

Asus 2023 Vivobook series

 Asus 2023 Vivobook series : लॅपटॉप बनवण्यात आघाडीवर असणारी कपनी असूसने Asus 2023 Vivobook series या सिरिजतंर्गत ८ नवे आणि दमदार असे लॅपटॉप लाँच केले आहेत. अप्रतिम असा OLED डिस्प्ले Asus ची आईसकूल टेक्नोलॉजी आणि इतर दमदार फीचर्स या लॅपटॉप्समध्ये आहेत.तर या नव्या लॅपटॉप्समध्ये Vivobook S15 OLED, Vivobook 15X OLED, Vivobook 15X, Vivobook 15, Vivobook 16, Vivobook S 14 Flip, Vivobook Go 15 OLED आणि Vivobook GO 15 या मॉडेल्सचा समावेश आहे. हे सर्व मॉडेल्स intel 13th Gen Core Processor सोबत येत असून आउट ऑफ द बॉक्स विंडोज 11 वर काम करतात.

प्रत्येक मॉडेलची किंमतही वेगळी

भारतात या मॉडेल्सची किंमत म्हणाल तर Vivobook 15X ची सुरुवातीची किंमत ४७,९९० रुपये इतकी आहे. Vivobook 15 (2023) ची किंमत ४५,९९० रुपये, Vivobook 16 (2023) ची किंमत ४७,९९० रुपये आहे. Vivobook S 14 Flip (2023) ची किंमत ७९,९९० रुपये आणि Vivobook Go 15 (2023) ची किंमत ४०,९९० रुपये आहे. याशिवाय Vivobook S15 OLED ची सुरुवातीची किंमत ८५,९९० रुपये, Vivobook 15X OLED ची किंमत ७४,९९० रुपये आणि Vivobook GO 15 OLED ची किंमत ४८,९९० रुपये आहे. हे सर्व लॅपटॉप्स अॅमेझॉन फ्लिपकार्टसह असूसच्या ई-शॉपवर ऑनलाईन तर क्रोमा, विजय सेल्स, रिलायन्स डिजीटल अशा स्टोअर्समध्ये ऑफलाईनही उपलब्ध आहेत. यातील काही खास लॅपटॉपचे खास फीचर्स पाहू..

Broadband Plan : स्वस्तात मस्त ब्रॉडबँड प्लॅन्स मध्ये 200Mbps ची स्पीड आणि बरंच काही

Asus Vivobook 15, Vivobook 16 चे खास फीचर्स

Asusu Vivobook 15,Asus Vivobook 16

या मॉडेल्समध्ये ओएलईडी स्क्रिन असून विंडोज ११ सपोर्ट आहे. दोन्हीही 13th जेन इंटेल कोर i5 वर काम करत असून १६जीबी रॅम आणि ५१२ एसएसडी स्टोरजसह येतात. यात १६इंच आणि १५ इंच असे ऑप्शन्स आहेत.

Vivobook S 14 Flip चे खास फीचर्स

Asus Vivobook s 14

१६जीबी रॅम आणि १टीबी एसएसडी स्टोरेजसह 13th जेन इंटेल कोर i7 प्रोसेसर या लॅपटॉपमध्ये आहे. यामध्ये ५००नीट्सचा ब्राईटनेस आणि १४ इंतर २.८k टचस्क्रिन डिस्प्ले आहे.

Asus Vivobook Go 15 OLED चे खास फीचर्स

Vivobook Go 15 OLED मध्ये 12th जेन इंटेल कोर i3-N305 सीपीयू आहे. ज्यात ८जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी स्टोरेज आहे. १५.६ इंचाचा डिस्प्ले असून विंडोज ११ सपोर्ट आहे. या लॅपटॉपमध्ये बॅकलिट किबोर्डही आहे.

Leave a Reply