Benefits of ayurveda salt :चला तर माहिती करून घेऊ आयुर्वेद मिठाचे फायदे

ayurveda\salt\ayurvedic\pink salt\rock salt\ayurveda salt\oj ayurveda salt\himalayan salt\oj ayurved salt\sanyasi ayurveda\sanyasi ayurveda review\sanyasi ayurveda products\rock salt ayurveda for everyone\pink salt ayurveda for everyone\ayurveda salt benefits and side effects\sea salt\himalayan pink salt\healthy salt\salt benefits\ayurveda lavana ras\oj ayurveda 6 ras\ayurveda man\ayurveda tip\six rasas in ayurveda\ayurveda health tips

शेंदेलोण (सैंधव), पादेलोण, बीडलवण, सांबरलोण आणि दर्याई मीठ असे आयुर्वेदामध्ये मिठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये सैंधव(मिठा)चा वापर करतात. स्वयंपाकघरात, तर कुठल्याच अन्नपदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही. त्यामुळे अन्नपदार्थामध्ये याचे महत्त्वाचे स्थान आहे. परंतु याच्या अतिवापरामुळे विविध आजारांची लागण होऊन जीवन बेचव होऊ शकते, म्हणून सावध रीतीने मिठाचा आहारात वापर करावा. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते. सैंधव हे आरोग्यास हितकारक व त्रिदोषशामक असते, म्हणून चरकाचार्य सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण (मीठ) असे म्हणतात. आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरातील वापरावयाचे मीठ हे सामान्यत: समुद्रातून मिळविलेले असते.

◆गुणधर्म

मीठ हे अग्नी प्रदीप्त करणारे धातुवर्धक, कृमिनाशक, रुचीकारक बल्य असते. परंतु त्याचा वापर हा योग्य प्रमाणातच करावा. ते अजीर्ण, उदरशूळ (पोटदुखी) व गॅसेस या विकारांवर उपयुक्त असते. स्वच्छ चमकदार, चौकोनी तुकडय़ांच्या आकारातील खडे मीठ हे आरोग्यास लाभदायक असते. सूक्ष्म, दाणेदार, आयोडीनयुक्त महागडय़ा मिठापेक्षा खडे मीठ वापरणे कधीही फायद्याचे असते. कारण शुभ्र व दाणेदार मीठ बनविताना अनेक रसायनांचा वापर करतात. त्यामुळे ते शरीरास घातक होऊ शकते. आयोडाइज्ड मिठाची जाहिरात सर्वसामान्यांची दिशाभूल करणारी असते. प्रत्येक सामुद्रिक मिठामध्ये आयोडीन हे असतेच. शरीराला आयोडिनची जेवढी गरज आहे. तेवढी गरज खडे मिठातूनही भागते. वेगळे असे आयोडाइज्ड मीठ वापरण्याची गरज नाही.

दिवसांतून चार ग्रॅम्स एवढी मिठाची गरज शरीराला असते. त्यापेक्षा जास्त नको. भाजी, आमटी, चटणी, कोिशबीर इत्यादी पदार्थामधून ही गरज भागते. तरीही लोक या पदार्थासोबत चटणी, पापड, लोणचे, हवाबंद डब्यातील सूप, ब्रेड, सॉस, केचअप यांचे अधिक प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे शरीरात मिठाचे प्रमाण हळूहळू आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. परिणामी विविध आजारांची निर्मिती होते. तसेच लहान मुलांबरोबरच सर्वानाच बाजारचे बटाटा आदी वेफर्स खायची सवय असते. हे वेफर्स जास्त काळ टिकण्यासाठी यामध्ये मिठाचा वापर हा पाचपट अधिक प्रमाणात केलेला असतो. त्यामुळे हे वेफर्स खाऊन आरोग्याची हानी होते. वेफर्स खायचेच असतील, तर घरी बनविलेले खावेत.

https://marathidisha.com/protein-diet-

◆उपयोग

१.ओवा, मीठ व जिरे वाटून त्याची बारीक पूड घेतल्याने अपचनातून निर्माण झालेली पोटदुखी कमी होते.
२. लहान मुलांना जर कृमी झाले असतील, तर मिठाचे पाणी सकाळीच पिण्यास दिल्यास कृमी संडासावाटे बाहेर पडतात.
३. हात किंवा पाय मुरगळल्यास त्यावर हळद व मिठाचा लेप लावावा. सूज लगेचच कमी होते
४. घसा किंवा दाढ दुखत असेल, तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

◆दुष्परिणाम

१. मिठाचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात केला, तर आमाशय व आतडय़ातील श्लष्मिक कफाचे नुकसान होऊन दाह निर्मिती होते.
२. मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने त्वचाविकार, रक्तदाब, सर्वाग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे विकार उद्भवतात. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतडय़ामधून कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्याचबरोबर निर्माण झालेले कॅल्शियम शरीरातून बाहेर काढते. यामुळे हाडांची झीज हा विकार जडतो.

◆पर्यायी पदार्थ

आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आजारांची लागण होते. थायरॉईड ग्रंथीमधून बाहेर पडणारे थायरॉक्सिन हे हार्मोन तयार होण्यासाठी आयोडिनची जरुरी असते. याचे दररोजचे आवश्यक प्रमाण १५० मिलीग्रॅम्स इतके आहे. याच्या अभावाने थायरॉइड गॉयटर नावाचा विकार होतो. म्हणून रुग्ण घाबरून आयोडीनयुक्त मीठ जास्त प्रमाणात खाण्यास सुरुवात करतात. परंतु नसíगक पदार्थामधूनही आपल्याला आयोडीन भरपूर प्रमाणात मिळते. जसे की पुढील पदार्थ- अननस, सफरचंद, बटाटा, टोमॅटो, लसूण, शिगाडा, सागरी व पाण्याकाठच्या वनस्पती जसे घोळ, कमलकंद, सागरी मासे. या सर्वामधून आयोडिनची गरज भागते. म्हणून दिवसांतून चार ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. हेच योग्य आहे.

Leave a Reply