सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपआपला विरंगुळा शोधत असतो. कोणी भटकंती करतं, तर कोणी आवडते इतर छंद जोपासतं. अनेकांना गेम खेळण्याचीही आवड असते, आता गेमिंग ही फक्त लहानग्यांसाठीच नसून मोठे लोकही तगडे गेम खेळत असतात. कितीतरी जण गेमिंगमधून पैसेही कमवतात.
- Gaming Laptop | Best Gaming Laptop 2023 | Best gaming Laptop List 2023

Best 5 Gaming Laptop List 2023: आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! : लॅपटॉपचा जितका वापर ऑफिस कामाकरता केला जातो, तसाच गेमिंग आणि एटंरटेनमेंटसाठी देखील करण्यात येतो. पण मार्केटमध्ये वेगवेगळे गेमिंग लॅपटॉप असल्याने नेमका पर्याय निवडणं अवघड आहे.
Best Gaming laptops :
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपआपला विरंगुळा शोधत असतो. कोणी भटकंती करतं, तर कोणी आवडते इतर छंद जोपासतं. अनेकांना गेम खेळण्याचीही आवड असते, आता गेमिंग ही फक्त लहानग्यांसाठीच नसून मोठे लोकही तगडे गेम खेळत असतात.
कितीतरी जण गेमिंगमधून पैसेही कमवतात. दरम्यान तगडे गेम खेळायचे असल्यास तसाच लॅपटॉपही तगडे फीचर्स असणारा असायला हवा. पण अनेक दमदार गेमिंग फीचर्स असणारे लॅपटॉप्स हे लाखाच्या घरातही असतात.

आता तुम्हाला देखील असाच भन्नाट फीचर्सचा गेमिंग लॅपटॉप घ्यायचा असेल पण गोंधळात असाल तर? किंमतीच्या बाबतीत सर्वोत्तम काही पर्याय असणारे गेमिंग लॅपटॉप आम्ही तुम्हाला सांगणार आहोत… Acer, MSI, Gigabyte यासह अनेक कंपन्यांचे गेमिंग लॅपटॉप परवडणाऱ्या किमतीत बाजारात दाखल झाले आहेत. चलातर याबद्दल जाणून घेऊ..
1. Acer Nitro 5

या यादीत एक जबरदस्त लूक असणारा लॅपटॉप म्हणाल तर तो Acer कंपनीचा आहे.
- Acer Nitro ५ असं या मॉडेलचं नाव असून यामध्ये 12th Gen Intel Core i5-१२५०००H प्रोसेसर आहे. हा Acer लॅपटॉप Nvidia RTX ३०५० GPU सह येतो.
- या लॅपटॉपमध्ये १५.६ इंच फुलएचडी डिस्प्ले आहे आणि त्याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्झ (Hz) आहे.
- हा लॅपटॉप विंडोज ११ होम सह येतो. या डिव्हाइसच्या स्टोरेजमध्ये ५१२ GB स्टोरेजचा पर्याय मिळतो.
- लॅपटॉपमध्ये ८GB रॅम आहे जी ३२GB पर्यंत अपग्रेड देखील केली जाऊ शकते.
- याशिवाय, युजर्स Nvidia च्या RTX ३०५०ti सह मॉडेल देखील खरेदी करू शकतात.
- या प्रकारात उत्तम कूलिंग आणि बॅकलिट आरजीबी कीबोर्डसह क्वाड एक्झॉस्ट डिझाइन आहे.
- हा लॅपटॉप Amazon वरून Rs.७९, ९९९मध्ये खरेदी करता येईल.
2. MSI Katana GF66

- MSI कंपनीचा MSI Katana GF६६ लॅपटॉप Nvidia RTX ३०६० द्वारे येतो. यामध्ये १२th Gen Intel i७-१२४५०H प्रोसेसर असून लॅपटॉपचा रिफ्रेश रेट १४४ Hz इतका आहे.
- तसंच १५.६ इंच फुलएचडी स्क्रीन लॅपटॉपमध्ये देण्यात आली आहे. हा लॅपटॉप विंडोज ११ होम सह येतो.
- या डिव्हाइसमध्ये १६GB रॅम आणि ५१२GB स्टोरेज आहे. हा डिव्हाईस ८४,९९० रुपयांना खरेदी करता येईल. हा लॅपटॉप Nvidia RTX ३०६० सह येणारा सर्वात स्वस्त लॅपटॉप आहे.
3. Asus TUF Gaming A15

- गेमिंग लॅपटॉप तयार करण्यात हातखंडा असणारी Asus कंपनीचा Asus TUF Gaming Laptop या यादीत आहे. हा लॅपटॉप अनेक प्रकारांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
- परंतु Nvidia RTX ३०६० GPU सह Asus TUF Gaming A१५ लॅपटॉप दमदार आहे.
- यामध्ये १५.६-इंच फुलएचडी स्क्रीन आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १४४ Hz आहे आणि तो Windows ११ होमसह येतो.
- या लॅपटॉपमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजचा पर्याय आहे.
- या Asus लॅपटॉपमध्ये AMD Ryzen ९ ५९००HX प्रोसेसर देण्यात आला आहे. हा लॅपटॉप RGB बॅकलिट कीबोर्डसह येतो. याची किंमत ही ९७,९०० इतकी आहे.
4. Dell G15-5515

- प्रसिद्ध लॅपटॉप कंपनी Dell देखील गेमिंग लॅपटॉप तयार करते. या यादीत डेलचा Dell G१५-५५१५ हा गेमिंग लॅपटॉप आहे.
- AMD Ryzen ७ ५८००H आणि Nvidia RTX ३०६० GPU सह हा मॉडेल येतो. या लॅपटॉपमध्ये १६५ Hz इतका रिफ्रेश रेट असून १५.६ इंचेसची फुलएचडी स्क्रीन आहे.
- डेलच्या इतर गेमिंग लॅपटॉपप्रमाणे या लॅपटॉपमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.
- मात्र, हा लॅपटॉप इतर पर्यायांच्या तुलनेत काहीसा महाग आणि जड आहे.
- पण हा एकमेव लॅपटॉप आहे जो मायक्रोसॉफ्ट ऑफिससोबत येतो. या लॅपटॉपची किंमत १,०२,९९० रुपये आहे.
5. Gigabyte G5 2023

- Gigabyte कंपनीने देखील नुकतेच काही नवनवीन लॅपटॉप लॉन्च केले आहेत. यातील एक गेमिंग लॅपटॉप म्हणाल तर Gigabyte G५ MF १२.
- या लॅपटॉपमध्ये Gen Intel Core i5-१२४५०H प्रोसेसर आहे. तसंच Nvidia चं लेटेस्ट RTX ४०५० GPU हे ग्राफिक कार्ज असून हे कॉनफिगरेशन असणारा या यादीतील हा एकमेव लॅपटॉप आहे.
- कंपनीने हा लॅपटॉप अजून भारतात लॉन्च केलेला नाही. Gigabyte G५ MF ची किंमत रु.९०,९९९ पासून सुरू होते.
- जर तुम्ही थोडे जास्त पैसे खर्च करू शकत असाल तर तुम्ही Gigabyte G५ KF लॅपटॉप खरेदी करू शकता.
- हा लॅपटॉप १२th Gen Intel Core i५-१२५००H आणि Nvidia RTX ४०६० सह येतो. त्याची किंमत १०७,९९९ रुपये आहे.
हे सुद्धा वाचा :-