Get cash for old Phone : नवीन फोन घेताना आपण अनेकदा आपल्या जुन्या फोनला एक्सचेंज करुन नवीन फोन घेतो, पण जुन्या फोनची जास्तीत जास्त किंमत मिळावी, यासाठी काही निवडक Websites वर तुम्ही फोन विकू शकता.

Sell your old smartphone on Website : आजकाल दररोज नवनवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये येत आहेत. प्रत्येक फोन काहीतरी नवीन फीचर घेऊन येत आहे. त्यामुळे लोकही नवनवीन टेक्नोलॉजी वापरण्यासाठी आपले स्मार्टफोन्सही सतत बदलताना दिसत आहेत. आधी २ ते ३ वर्षे एक फोन वापरणाऱ्यांची संख्या खूप होती. कितीतरीजण तर ४ ते ५ वर्षेही एक फोन वापरत असत. पण आजकाल दरवर्षाला नवीन फोन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोक सतत फोन बदलत आहेत. तर अशामध्ये नवीन फोन घेताना जुन्या फोनचं काय करायचं तर त्याला एक्सचेंजमध्ये देऊन किंवा विकून पैसे मिळवले जातात. तर तु्म्हालाही असाच जुना फोन विकायचा असेल आणि तगडी किंमत मिळवायची असेल तर काही Websites बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- Cashify.in

जुने फोन विकायचं म्हणाल तर सध्या cashify.in ची सर्वाधिक चर्चा आहे. अगदी सिंपल स्टेप्समध्ये तुम्हाला इथे तुमचा जुना फोन विकता येतो. Cashify.in वेबसाइट व्यतिरिक्त त्यांचं एक मोबाइल अॅप देखील आहे. जेव्हा तुम्ही तुमचा जुना फोन विकायला जाता, तेव्हा सर्वात आधी तुम्हाला फोनचं वय म्हणजेच फोन कधी विकत घेतला आहे ते आणि बॉक्समधील सामग्रीबद्दल विचारले जाते. यानंतर फोनबद्दल विविध माहिती विचारली जाते, काही टेस्ट त्या अॅपमध्येच केल्या जातात. या सर्वानंतर जुन्या फोनसाठी किती पैसे दिले जातील, हे सांगतिले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर तुम्ही मान्य केल्यास तुमचा फोन घेण्यासाठी आणि तुम्हाला पैसे देण्यासाठी कॅशिफायचा एजंट घरी येतो. त्याची वेळ आणि ठिकाण तुम्ही शेड्यूल करू शकता. कॅशिफायचे आऊटलेटही आहेत, जिथे तुम्ही फोन विकू शकता.
2. getinstacash.in
Getinstacash.in ची सेवा देखील Cashify सारखीच आहे आणि ती देखील तुमच्या घरीपर्यंत येते. ही कंपनीही आधी जुना फोन घेते आणि नंतर पैसे देते. या कंपनीच्या साईटवर तुम्ही स्क्रोल करून तुमच्या फोनच्या स्टेटसबद्दल सर्व माहिती भरु शकता आणि तिथे तुमच्या फोनची किंमत सांगितली जाईल. त्यानंतर तुम्ही पिकअप शेड्यूल करू शकता. यामध्ये कंपनीचा एक्झिक्युटिव्ह येतो आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टींनुसार फोनची स्थिती तपासतो, पैसे देतो आणि फोन घेतो.
3. recycledevice.com
तुम्हाला तुमचा जुना फोन विकायचा असेल तर recycledevice.com हा देखील चांगला ऑप्शन आहे. विशेष म्हणजे माहितीतुन असं समोर येत आहे की, इतर Website च्या तुलनेत याठिकाणी १,००० रुपये अधिक मिळत आहेत. दरम्यान या साईटवर जुना फोन विकण्याची प्रक्रिया जवळपास कॅशिफायसारखीच आहे.Website वर गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला फोनच्या स्थितीबाबत काही प्रश्न विचारले जातील आणि शेवटी त्याची किंमत सांगितली जाईल. यानंतर तुम्ही तुमचा फोन पिकअप शेड्यूल करू शकता.
4. sellncash.com
तुम्ही तुमचा फोन विकत असाल, तर तुम्ही एक-दोन नव्हे तर चार-पाच Website वर फोनची किंमत तपासू शकता. तुम्हाला जिथे जास्त मिळेल तिथे विक्री करा. sellncash.com ही एक चांगली मोबाइल ट्रेडिंग वेबसाइट आहे. याठिकाणी तुम्ही तुमचा फोन आणि टॅबलेट विकू शकता. डिव्हाइस विकण्यासाठी, प्रथम तुम्हाला ब्रँड निवडावा लागेल आणि नंतर तुम्ही मॉडेलचे नाव निवडू शकता. यानंतर फोनच्या स्थितीशी संबंधित प्रश्न असतील आणि तुम्ही ती माहिती भरल्यानंतर फोनची किंमत शेवटी सांगितली जाईल. ज्यानंतर तुम्हाला मान्य असल्यास तुम्ही फोन पिकअप सेट करू शकता.
5. cashonpick.com
cashonpick.com ही वेबसाइट देखील जुन्या फोनच्या बदल्यात रोख रक्कम देते. दरम्यान या ठिकाणी देखील फोन विकण्याची पद्धत तीच आहे. जी तुम्हाला कॅशिफाय आणि इतर साईट्सबाबतत सांगितली आहे. येथेही सर्वप्रथम तुमच्या फोनचा ब्रँड किंवा नाव शोधावे लागेल मग फोन मॉडेल निवडा. यानंतर तुमच्या फोनबद्दल काही प्रश्न विचारले जातील. सगळी माहिती भरुन झाली की शेवटी फोनची किंमत सांगितली जाते. त्यानंतर तुम्ही तुमचे पिकअप शेड्यूल करू शकता.