SmartPhone tips : आता उन्हाळा सुरु झाला असून एकीकडे वाढती उष्णता आपल्या आरोग्यासह उपकरणांसाठीही हाणीकारक आहे. स्मार्टफोनही जास्त तापून खराब होऊ शकतात. त्यामुळे खास काळजी घेणं गरजेचं आहे.

SmartPhone Care in Summer : उन्हाळा आल्याने आता सर्वत्र उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे बदलत्या वातावरणामुळे लोकांना प्रकृतीच्या अडचणी होताना दिसत आहेत. तसंच दुसरीकडे हा वाढता उष्मा आपल्या जवळील इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठीही फार हाणीकारक आहे. दरम्यान अशा या कमालीच्या उकाड्यात आपला स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात तापत असल्याचं दिसून येतं. तो तापल्यामुळे त्याच्यात आणखी अडचणी निर्माण होतात. फोन हँग होऊ शकतो. दरम्यान या सर्व फोनच्या प्रॉब्लेम्सपासून वाचायचं असल्यास स्मार्टफोनची देखभाल आणि वापरात बदल करण्याची नितांत गरजआहे. तर फोन अधिक तापू नये आणि तापल्यास त्याची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. तर यासाठीच आम्ही काही सोप्या टीप्स तुमच्यासोबत शेअर करत आहोत…
मोबाईल का गरम होतो?

तर सर्वात आधी जाणून घेऊ नेमका मोबाईल गरम का होतो ते. तर मोबाइल गरम होण्याची अनेक कारणे असू शकतात, पण जास्तवेळ वापरामुळे बॅटरीवर ताण किंवा व्हायरस ही मुख्य कारणं आहेत. त्यामुळे जर तुमच्या स्मार्टफोनच्या प्रोसेसिंगचा भार कमी झाला तर तो खूप वेगाने काम करू लागतो. हेवी प्रक्रिया करताना जसंकी गेमिंग, एडिटिंग अशावेळी फोन जास्त उष्णता निर्माण करतो आणि गरम होतो. त्याचप्रमाणे फोन गरम होण्यामागे मोबाईलच्या बॅटरीचाही महत्त्वाचा वाटा असतो. जर बॅटरी गरम झाली तर फोन गरम होऊ लागतो. त्याच वेळी, फोनमध्ये बग किंवा व्हायरस आल्यास, ते फोनचं काम स्लो करतात आणि त्यामुळे फोन गरम देखील होतो.
5 Best Work From Home : आता ऑनलाईन घरबसल्या कमवू शकता पैसे, डॉलर्समध्ये कराल कमाई
Smartphone जास्त चार्ज करु नका

तर फोन तापण्यापासून काळजी घेण्याकरता उन्हाळ्यात मोबाईलचं अधिक चार्जिंग करणं टाळा. फोन १०० टक्के चार्ज झाला पाहिजे असं नाही, बॅटरी ९० टक्के जवळ आल्यावर चार्जिंग थांबवू शकता. त्याचप्रमाणे फोन ओव्हरचार्ज करणे देखील धोकादायक ठरू शकते. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ चार्जिंगवर ठेवू नका.
तसंच जेव्हा फोनची बॅटरी कमी असते, तेव्हा ती कमी वापरण्याचा प्रयत्न करा. कमी बॅटरीमध्ये जास्त काम करताना, वीज वापर जलद होतो आणि प्रक्रिया देखील हेवी होते. अशा स्थितीत फोनला नुकसान होऊ शकतं त्यामुळे कमी बॅटरीमध्ये आवश्यक तेवढा फोन वापरणे चांगले.
जास्त वेळ गेम खेळू नका

तर स्मार्टफोनमध्ये गेम खेळताना प्रोसेसर पूर्ण क्षमतेने काम करतो. तसंच हेवी प्रोसेसिंगने देखील फोन गरम होतो त्यामुळे उन्हाळ्यात फोन हिट झाला तर थंड व्हायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत गेम खेळताना अधिक काळ खेळत नाही याती काळजी घ्यायला हवी. तसंच मोबाईलसाठी कव्हर वापरतानाही काळजी घ्यावी. म्हणजेच फोन चार्ज करताना त्याचं कव्हर काढून ठेवावं, ज्यामुळे फोन जास्त हिट होणार नाही.
फोन वापरताना काळजी घ्या

वाढता उकाडा पाहता प्रखर सूर्यप्रकाशात कॅमेरा वापरणं धोकादायक आहे. उन्हाळ्यात कॅमेऱ्याचा वापर उन्हाळ्यात मर्यादित असावा. सतत व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो काढणे हे देखील फोन हिट होण्याचे प्रमुख कारण बनते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फोन अधिक तापल्याने फोनचा मदरबोर्ड किंवा डिस्प्ले देखील बर्न करू शकते. सूर्यप्रकाशात कॅमेऱ्याचा अतिवापर केल्याने आयफोनची स्क्रीनच खराब झाली आहे अशी उदाहरणेही आपण पाहिली आहेत. तसंच अनेक मोबाईल वापरकर्ते असे आहेत, जे त्यांच्या फोनमध्ये अनेक अॅप्लिकेशन्स डाउनलोड करतात. यातील अनेक अॅप्स असे आहेत की ते दीर्घकाळ वापरले जात नाहीत. या सर्वामुळे फोन तापतो, त्यामुळे मर्यादित अॅप्स ठेवावी.
बॅकग्राउंडवर चालणाऱ्या अॅप्सवर लक्ष ठेवा
स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे अॅप्लिकेशन आपण वापरतो. अनेकदा आपण थेट होम बटण दाबून या अॅप्समधून बाहेर येतो. पण पूर्णपणे क्लोज न केल्याने हे अॅप मागे बॅकग्राऊंडला सुरु असतात ज्यामुळे फोन तापू शकतो. तसंच कोणत्याही स्मार्टफोनमध्ये अनेक नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी सेवा एकाच वेळी सक्रिय असतात. यामध्ये मोबाईल डेटा, लोकेशन, जीपीएस, ऑटो सिंक हे पर्याय बॅकग्राउंडमध्ये ऑन राहतात. ही फीचर्स मोबाइलमध्ये प्रोसेसर सतत सुरु ठेवतात आणि प्रोसेसरवर जास्त भार पडल्यास किंवा बॅटरी कमी झाल्यास ते फोनसाठी अधिक हाणीकारक ठरतं.
Smartphone कायम अपडेटेड ठेवा
काळजी घेताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोनला नेहमी लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीमवर अपडेट ठेवणं गरजेचं आहे. केवळ ओएसच नाही तर फोनमधील अॅप्लिकेशन्सही वेळोवेळी नवीन व्हर्जनमध्ये अपडेट करत राहायला हवे. अनेकवेळा फोनमध्ये बग असतात ज्यामुळे फोन स्लो होतो. त्यामुळे फोन अपडेट करावा. तसंच अधिक फोन तापल्यावर थोडावेळ बंदही ठेवू शकता.