Bhim Jayanti 2023:जगभरातच नव्हे तर स्पेस मध्ये देखील साजरी


Bhim Jayanti 2023: दर वर्षी भीम जयंती चा म्हणजेच Dr. B.R. Ambedkar जयंतीचा उत्साह हा आपल्याला जगभरात पाहायला मिळतोच यावर्षी तो उत्साह स्पेस मध्ये देखील पाहायला मिळणार आहे.

14 April 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 132वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती म्हणजे, देशभरात मोठा उत्साह समजला जातो. भीमसैनिकांकडून महिनाभरापूर्वी वेगवेगळ्या उपक्रम राबवण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र यंदाची बाबासाहेबांची जयंती हटके आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याच रजिस्ट्री करण्यात आली आहे. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं नामकरण होणार आहे. तर सर्वसामान्यांना हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.

अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था असून, या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावं देण्यात येतात. यासाठी भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरावे लागते. यंदाची बाबासाहेबांची जयंती आगळीवेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी, या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. शिंदे यांनी 9 फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता आणि आता त्यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं लाँचिंग होणार असून, https:// space-registry.org या स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून हा तारा पाहता येऊ शकतो. तसेच मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर हा तारा पाहता येणार आहे. 

जब तक सूरज चाँद रहेगा,बाबा तेरा नाम रहेंगा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गावागावात बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने रॅली काढली जाते. मात्र यावेळी ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेंगा’ अशी घोषणा दिली जाते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत देखील ही घोषणा देण्यात आली होती. त्यामुळे ही घोषणा लक्षात घेता राजू शिंदे यांनी बाबासाहेबांच्या नावाने अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे कोणालाही आपल्या नातेवाइकांचा किंवा स्वतःचं नाव या ताऱ्याला देता येत नाही. यासाठी नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक काम असायला हवं, त्यासाठी संबंधित संस्थेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून प्रक्रिया करत आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर  अखेर आकाशातील तार्‍याला बाबासाहेबांचं नाव मिळालं असल्याचं राजू शिंदे म्हणाले.

जाणून घेऊ इतरत्र कशी केली जाणार Bhim Jayanti 2023:

Pimpri 18 Hours Study Abhiyan डॉ.आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त MPSC विद्यार्थी सलग 18 तास अभ्यास करणार

पिंपरी चिंचवडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम सुरुये. Upsc आणि mpsc च्या परिक्षार्थींकडून सलग अठरा तास अभ्यास केला जातोय.

सकाळी 6 वाजता सुरू झालेला उपक्रम रात्री 12 पर्यंत चालेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची ही संकल्पना आहे.


Thane: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ठाणे निळ्या रंगानं उजळलं

Dr. B.R. Ambedkar जयंती पार्श्वभूमीवर आज ठाणे महापालिकेतर्फे आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

  • ठाणे महापालिकेतर्फे शहरातील मुख्य शासकीय इमारती तसेच पूल, पादचारी पूल यांच्यावर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.
  • ठाणे महापालिका मुख्यालय, राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह, जिल्हाधिकारी कार्यालय सजवण्यात आलं आहे.
  • तसेच नियोजन भवन, जुना आणि नवीन कळवा खाडी पूल, कोपरी, आनंदनगर पादचारी पूल आदींवर ही रोषणाई करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे.


Latur Dr Babasaheb Ambedkar Replica : लातुरात 18 हजार पुस्तकांद्वारे आंबेडकरांची भव्य प्रतिकृती

लातुरात १८ हजार पुस्तकांद्वारे आंबेडकरांची भव्य प्रतिकृती, ११ हजार चौरस फुट जागेवरची चित्रकृती पाहण्यासाठी गर्दी.

Bhim Jayanti 2023 : १८ हजार वह्यांतून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद


बुलढाण्यात आंबेडकर जयंतिनिमित्त फटाक्याची आतिषबाजी

बुलढाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जन्मोत्सवाचे स्वागत 13 एप्रिल च्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्याच्या आतिषबाजीने करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौकात शहरातील हजारो युवक जमले होते.

तेव्हा मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. तसेच घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. ही फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


परभणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त परभणीत विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता Dr. B.R. Ambedkar यांच्या पुतळ्यासमोर महावंदना होणार आहे. या वंदनेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. 


धुळे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अभिवादन केले जाणार आहे. तर शहरातील संदेश भूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श झाला आहे.


चंद्रपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात रॅली काढून अनेक संघटना बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतील.


वर्धा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वर्धा शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकर चौकामध्ये विविध रॅली आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. पहाटेपासूनच आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत.

Leave a Reply