भारतात एकेकाळी PUBG गेमने मुलांना अक्षरशः वेड लावले होते. अनेकांच्या मोबाइल मध्ये पबजी गेम होता. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने अनेक अॅप्सवर बंदी घातली त्यात या गेमचाही समावेश होता. परंतु, BGMI गेम पुन्हा येत आहे.
जवळपास १० महिन्याच्या बंदीनंतर आता BGMI (Battlegrounds Mobile India) भारतात पुनरागमन करणार आहे. या गेमवरील बंदी सरकारने उठवली आहे. गेल्या वर्षी या गेमवर बंदी घालण्यात आली होती. आता हे नव्या रुपात येत आहे, अशी माहिती कंपनीची सीईओनी दिली आहे. सोबत बीजीएमआयने एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. जाणून घ्या यासंबंधी सविस्तर.
Krafton चे पॉपुलर बॅटल रॉयल गेम Battlegrounds Mobile India (BGMI) भारतात परत येत आहे. जवळपास १० महिन्यापूर्वी या गेमवर सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयानंतर Google Play Store आणि Apple App Store वरून या गेमला रिमूव्ह करण्यात आले होते. परंतु, आता हा गेम पुन्हा येत आहे. त्यामुळे हा गेम खेळणाऱ्यांना नक्कीच आनंद होईल. BGMI हे PUBG Mobile India चे रिब्रँडेड व्हर्जन आहे. क्राफ्टनने काही बदलासोबत याला लाँच केले होते.
Google Cybersecurity Free Course 2023 : प्रमाणपत्रासह गूगलचा मोफत सायबरसुरक्षा कोर्स २०२३
कंपनीने काय म्हटले
Krafton India चे सीईओ Sean Hyunil Sohn ने या गेमच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे. आम्ही भारतीय अथॉरिटेजचे खूप आभारी आहोत. ज्यांनी आम्हाला Battlegrounds Mobile India (BGMI) च्या ऑपरेशनला पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. हा गेम लवकरच उपलब्ध केला जाणार आहे. गेल्या काही वर्षात केंद्रातील मोदी सरकारने ३०० हून जास्त अॅप्सवर बंदी घातली होती. त्यात बीजीएमआय एक असे अॅप होते. जे पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. Krafton ने भारतीय स्टार्टअप ईकोसिस्टम मध्ये १० कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.