weight gain:अपूर्ण झोप झाल्याने वाढूशकते वजन कसे ते पहा

तुम्हाला अपरात्री मध्येच भूक लागते का? मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही.आपल्या रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिजमध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू शकेल. असे करताना हमखास शिल्लक राहिलेले किंवा शिळे पदार्थ खातो किंवा काही तरी गोड पदार्थ जे कायम फ्रिजमध्ये ठेवलेले असते असे खातो.

  • या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की,अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात. शास्त्रज्ञांच्या मते, झोपचा देखील आपल्या चयापचयवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे दर्शविण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे
  • मध्यरात्री खाणे टाळण्याचे मार्ग
  • रात्रीचे जेवण झाले की साधारण अर्ध्या तासाने दात घासा, दात घासून झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही कारण नंतर परत दात घासायचा कंटाळा येतो.
  • जर का तुम्हाला वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही,संगणक,लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्सपासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे.अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.
  • कॅमोमाइल चहा प्यायल्याने आपल्याला शांत वाटते आणि चांगली झोप लागते, यामुळे अवेळी भूक लागत नाही.
  • थोडे पाणी प्या, बऱ्याच वेळा आपण आपली भूक पाणी पिऊन देखील शमवू शकतो.
  • जर का तुम्हाला काही खायचेच असेल तर दही, दूध यासारखे पौष्टिक पदार्थ खा.
  • आपल्या आयुष्यातील ताण कमी करा, यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार करा. यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागेल.
  • दिवसा थोड्या थोड्या अंतराने खाल्याने, तुम्हाला अवेळी खाण्याची इच्छा होणार नाही. सकाळचे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ, जेवण कधीही चुकवू नका.

आता तुम्हाला समजले असेल कशाप्रकारे आपण शांत झोप मिळवू शकतो. तसे प्रयत्न करून किमान सहा ते आठ तास झोपा आणि मध्यरात्री उठून जंक फूड खाणे टाळा!

Leave a Reply