तुम्हांला तुमचा दिवस छान आणि आनंददायी जाण्यासाठी सकाळी-सकाळी काय हवे असते तर एक परिपूर्ण नाश्ता हवा असतो. रात्रभराच्या विश्रांतीनंतर तुमच्या अवयवांना लागणारी ऊर्जा पुरवण्यासाठी या नाश्त्याची गरज असते. तसेच नाश्ता हा दिवसभरातील आहारापैकी महत्वाचा आहार असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर अनशापोटी म्हणजेच रिकाम्यापोटी काय खावे काय खाऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. जर सकाळी रिकाम्या पोटी जर काही चुकीच्या पदार्थांचे सेवन केले तर त्यामुळे आरोग्यविषयक आणि पोटविषयक विविध समस्या निर्माण होतात. या निर्माण होऊ नये म्हणून रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाऊ नये याची काही माहिती आम्ही देणार आहोत.

मसालेदार आणि तिखट पदार्थ
प्रत्येकाला मसालेदार आणि चटपटीत पदार्थ हे आवडत असतात. परंतु जर तुम्हांला पचनविषयक पोटविषयक काही समस्या नको असतील तर, प्रत्येकाने हे मसालेदार चटपटीत पदार्थ हे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी खाणे टाळणे अवश्यक असते. मसालेदार आणि तिखट पदार्थ तुमच्या आतड्यांसाठी हानिकारक असतात. तसेच ते पोटात हानिकारक अम्लाची निर्मिती करतात आणि त्यामुळे तुम्हांला ऍसिडीटी किंवा गॅस्टिक अल्सर सारख्या समस्या निर्माण करतात.
साखरयुक्त पदार्थ आणि पेय
गोड पदार्थ कोणला आवडत नाही, पण सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही अति प्रमाणत गोड पदार्थ किंवा पेये याचे सेवन केले तर तुमच्या रक्तातील साखर वाढेल आणि यामुळे तुमच्या यकृतावर आणि स्वादुपिंडावर दबाब येऊन त्यांच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आणि दररोजचे अति साखरयुक्त पेये आणि पदार्थाचे रिकाम्या पोटी सेवनामुळे भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असते.
आंबट फळे
तुम्हाला वाटत असेल फळे तर सगळ्यात आरोग्यदायी आहार आहे, हो हे खरे असले तरी आंबट फळे म्हणजेच सायट्रिक असलेली फळे रिकाम्य पॉट खाल्याने पोटात ऍसिडीचे प्रमाण वाढवण्याची शक्यता असते. तसेच टोमॅटो सारख्या भाज्या देखील रिकाम्य पोटी खाणे टाळावे याने ऍसिडिटी किंवा गॅसेससंबधी समस्या वाढण्याची शक्यता असत.