आता येणार हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस, धुरा ऐवजी होणार फक्त पाण्याचे उत्सर्जन-
Hydrogen Buses :
- भारतातील वाहतूक कार्बनमुक्त करण्यसाठी राज्य व देशपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
- पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांनंतर आता हायड्रोजन वर चालणाऱ्या बसेस येणार आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL)
- मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने सार्वजनिक वाहतुकीतले आपले नेतुत्व पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे.
- पुढील पिढीची वाहतूक व्यवस्था ठरणाऱ्या नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या हायड्रोजन बसेसचे लवकरच भारतीय बाजारपेठ आगमन होणार आहे .
- रिलायन्ससोबत तांत्रिक सहकार्याने हायड्रोजन बसची घोषणा ऑलेक्ट्राने आज केली.
- पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला संपुर्ण कार्बनमुक्त पर्याय म्हणजे हायड्रोजन बस.
- वायु, जल प्रदुषणाला आळा घालणाऱ्या हायड्रोजनवर चालणाऱ्या या बसेस ऑलेक्ट्राच्या कारखान्यात तयार होणार आहेत.
- या उपक्रमामुळे भारत सरकारच्या कार्बनमुक्त हायड्रोजन इंधनाच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला बळ मिळेल.
पर्यावरण पूरक आणि परकीय चलन
- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्या नुसार पर्यावरण पूरक आणि परकीय चलन वाचवणाऱ्या इंधनाच्या संशोधनात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.
- बॅटरी किंवा विद्युत घटांवर चालणाऱ्या बस गाड्या आता सर्वच महापालिका क्षेत्रात दिसू लागल्या आहेत.
- आता तर थेट हायड्रोजनवर चालणाऱ्या आणि धुरा ऐवजी पाण्याचे उत्सर्जन करणाऱ्या बसेस लवकरच सार्वजनिक वाहतुकीत मोठी क्रांती घडवणार आहेत.
- महत्वाचे म्हणजे यामूळे देशाचे हायड्रोकार्बन म्हणजेच कार्बन इंधन आयात करण्यासाठी लागणारे बहुमुल्य परकिय चलन वाचणार आहे.
हे सुद्धा वाचा –
Tata-share: ₹५२५ वरतीजाईल-विक्रीत जबरदस्तझेप?
आता येणार हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस
कोणत्या सोय असणार आहेत
- 12-मीटरच्या लो-फ्लोअर बसमध्ये प्रवाशांसाठी 32 पासून 49 आसनाची सोय असणार आहे.
- या व्यतिरिक्त एक ड्रायव्हरचे आसन अशी एकूण आसन क्षमता असेल.
- एकदा हायड्रोजनची टाकी फुल्ल केल्यानंतर बस 400 किमी पर्यंत प्रवास करू शकेल.
- या प्रवासाला लागणारा हॉयड्रोजन वायू भरायला फक्त १५ मिनीटे लागतात.
- डिझेल पेट्रोल सारखे कार्बन इंधन वापरणाऱ्या पारंपारिक बसेसच्या उत्सर्जनाचा विचार केला तर या बसेस फक्त पाणी उत्सर्जीत करतात.
- जुन्या डिझेल आणि पेट्रोल वर चालणाऱ्या बसेस टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक बसेसमध्ये परावर्तित करण्याच्या केंद्र सरकारच्या महात्वाकांक्षी योजनेला यामूळे चालना मिळेल.
- या बसेसमध्ये वरच्या बाजूला टाइप-4 हायड्रोजन सिलिंडर बसवलेले असतात.
- हे सिलिंडर -20 ते +85 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात.
- येत्या वर्षात या बसेस व्यवसायिक वापरसाठी उपलब्ध करून देण्याचे ऑलेक्ट्राचे उद्दिष्ट आहे.