अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या जगातल्या आघाडीच्या संस्थामध्ये "भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा" (इस्रो) समावेश होतो.
ISRO Job Requirement: इस्रोमध्ये नोकरी! काय आहे पात्रतेचे निकष? कसा मिळवायचा जॉब? अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या जगातल्या आघाडीच्या संस्थामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) समावेश होतो.
अमेरिकेतल्या नासा या संस्थेनंतर इस्रो ही सर्वांत मोठी अंतराळ संशोधन संस्था आहे. आतापर्यंत ‘इस्रो’ने अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि स्पेस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करण्याचं अनेकाचं स्वप्न असतं; पण ‘इस्रो’मध्ये नोकरी कशी मिळवायची, हा मूलभूत प्रश्न अनेकांच्या मनात असतो. ‘टेक गिग’नं याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इस्रोमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातली नोकरी मिळवणं हे सर्वांत कठीण काम आहे. इस्रो ही भारतातल्या प्रमुख संस्थांपैकी एक असल्यामुळे अनेकांना या संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याची उत्सुकता असते. इस्रोमध्ये नोकरी मिळवायची असेल, तर इस्रोच्या जॉब करिअर पेजकडे लक्ष द्यावं लागेल.
अधिक माहितीसाठी :-
Indian Space Research Organisation (ISRO) is the space agency of India.
इस्रोमध्ये नोकरीसाठीची पात्रता :
बारावीनंतर इस्रोमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल तर सुवर्णसंधी आहे. त्यासाठी आयआयएसटीचा आधार घेऊ शकता. आयआयएसटीनंतर इस्रो थेट कामावर घेऊ शकते. बीटेकनंतर आयसीआरबी परीक्षेद्वारेदेखील इस्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. आयसीआरबी परीक्षेत पात्र ठरलात, तर पॅनेल डिस्कशनसाठी बोलवलं जाईल आणि नंतर तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकेल.
आयसीआरबी परीक्षेसाठी पात्रता निकष :
आयसीआरबी ही इस्रोमध्ये निवड होण्यासाठीची एक प्रवेश परीक्षा आहे. बीई, बीटेक, बीएस्सी (Eng.) आणि डिप्लोमा+बीई/बीटेक (लॅटरल एंट्री) चारपैकी एक पदवी असलेल्या विद्यार्थ्यांनाच या परीक्षेसाठी अर्ज करता येतो.
कम्प्युटर इंजिनीअरिंग (Computer Enginering)नंतर इस्रोमध्ये नोकरी मिळविण्यासाठी पात्रता :
- बीटेक किंवा बीईमध्ये किमान 65 टक्के गुण असणं गरजेचं आहे.
- वय 35 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे.
- इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्डाची परीक्षा दिली पाहिजे.
- इस्रोमध्ये नोकरी मिळण्यासाठी लेखी चाचणी आणि मुलाखत देणं गरजेचं आहे.
अधिक माहितीसाठी :-
ISRO Job Requirement: इस्रोमध्ये नोकरी! काय आहे पात्रतेचे निकष? कसा मिळवायचा जॉब?
सामान्य मुलाखत प्रश्न :
‘इस्रो'(ISRO) मध्ये नोकरी कशी मिळवायची, हा मूलभूत प्रश्न अनेकांच्या मनात असतोच. त्यासाठी काही मुलाखत प्रश्न :-
- स्वत: बद्दल सांगा.
- कशामुळे तुम्ही नोकरी बदलत आहात?
- पाच वर्षांनंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहता?
- तुमच्या चांगल्या आणि वाईट बाजू कोणत्या आहेत?
- दडपणाखाली काम करत असाल, तर तुम्ही स्वतःला कशा प्रकारे मोटिव्हेट करून काम वेळेवर पूर्ण कराल?
हे सुद्धा वाचा:-