महाराष्ट्र हे राज्य नावारूपाला आलेले नसताना मराठी भाषिक ज्या प्रदेशात होते तेथे विविध कलाप्रकार आणि अध्यात्मिक बांधिलकी मात्र होती. त्यावरून हिंसाचार हा कधीच महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती राहिलेली नाही.
King Of World: छत्रपती श्री शिवाजी महाराज – रयतेचे राज्य-स्थापना हिंदवी स्वराज्याची…
पूर्वी भारतातील संस्कृती – ही विविधतेने सजलेली होती. प्रत्येक समाजात आणि प्रदेशात थोड्या फार फरकाने सांस्कृतिक आणि पारंपारिक फरक होता. त्यातील मुख्य फरक म्हणजे बोलीभाषेचा फरक!
महाराष्ट्र हे राज्य
- नावारूपाला आलेले नसताना मराठी भाषिक ज्या प्रदेशात होते तेथे विविध कलाप्रकार आणि अध्यात्मिक बांधिलकी मात्र होती.
- त्यावरून हिंसाचार हा कधीच महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती राहिलेली नाही.
- आध्यात्माचे एक पौराणिक अधिष्ठान महाराष्ट्रात स्थित होते.
- त्यावरून कळून येते की चार वर्णव्यवस्था ज्या संपूर्ण भारतात लागू होत्या त्या मराठी प्रदेशातही लागू झाल्या होत्या.
- या सर्व पारंपारिक प्रथा आणि विभागलेला समाजच परकीय आक्रमणाला कारणीभूत होता.
परकीय आक्रमणे
- अफगाणी सुलतान, बादशाह, पोर्तुगिज आणि इंग्रज हे या भूभागावर आक्रमण करतच आले होते. त्यांची पाळेमुळे वाढत जाण्याचे कारण म्हणजे त्यांनी भारतीयांना दाखवलेली महत्वाकांक्षेची स्वप्ने होती.
- वेगवेगळ्या भागांत सांस्कृतिक आणि पारिभाषिक फरक असल्यामुळे हे सर्व परकीय पूर्ण देशावरच सत्ता स्थापन करू शकले. महाराष्ट्रात किंवा पर्यायाने भारतात अगोदर राजे असायचे.
- त्यांचे हुकुमी नियम आणि प्रजादक्ष कारभार हा कुठल्याही राज्यासाठी हितावह होताच परंतु परकीय आक्रमणाची खबरदारी न घेतल्याने सर्व राज्ये मुघल आक्रमणाने ग्रसित होत गेली.
अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह
- उत्तरेत मुघल राज्य करीत होते तर फक्त महाराष्ट्राचा इतिहास लक्षात घेता अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांच्या अधिपत्याखाली पूर्ण महाराष्ट्र विभागलेला दिसून येत होता.
- दोन्ही सुलतान एकमेकांविरुद्ध लढत होते. त्यांना या मराठी प्रदेशात कुठलाच तिसऱ्या सत्तेचा विरोध नव्हता.
मराठी घराणी
- याउलट सर्व मराठी सरदार मात्र तुटपुंज्या वेतनात वतनदारी मिळवायचे आणि गडकिल्ल्यांचे संरक्षण करायचे. स्वराज्य असा काही प्रकारच नव्हता.
- त्यामुळे सामान्य रयतेवर झालेले अन्याय हे आपल्याच लोकांकडून करवून घेतले जायचे आणि हे सम्राट मात्र खुशाल राज्य करायचे.
- उत्सव साजरे करणे, पूजा करणे यांना बंदी येत होती. मंदिरे लुटली जात होती. वतनदारी आणि जहागिरी मिळवण्यातच मराठी घराणी व्यस्त होती.
- पूर्वीपासूनच राजेशाही ही पाहिली नसल्याने आणि एकजुटता नसल्याने प्रत्येक विभागात एक वेगळाच सरदार असायचा तो देखील कधी निजामशाहकडे तर कधी आदिलशाहकडे कार्यरत असायचा.
- त्यामुळे आक्रमण आणि प्रतिक्रमण होतच असायचे. सामान्य जनता एकदम त्रासून गेली होती.
- शेतकी आधार असल्याने उदरनिर्वाह तर व्हायचा परंतु त्यातदेखील कर आणि पिकवणीवर हे वतनदार हक्क दाखवायचे.
- अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असल्याने रयत त्यामध्ये गुंग होऊन जायची परंतु अन्याय वाढत होता तेव्हा अन्यायाला लगेच प्रतिकार होत नव्हता आणि तेवढी वेळ मारून नेली जात होती.
त्यापूर्वी आणि त्याकाळात देखील संतांची आणि साधूंची परंपरा महाराष्ट्रात होती त्यामुळे जगण्याचा एक उदात्त आधार ही संतमंडळी होती.
King Of World: छत्रपती श्री शिवाजी महाराज – रयतेचे राज्य-स्थापना हिंदवी स्वराज्याची…
वेरूळच्या भोसले घराण्याचे बाबाजीराव हे गावचे पाटील होते. त्यांना विठोजीराजे आणि मालोजीराजे अशी दोन मुले होती. दोन्ही मुले शुर होती.त्यांच्याकडे मोठी मराठ्यांची फौज होती. हत्यार बळ देखील होते. हे दोन्ही बंधू पराक्रमी असल्याने त्यांची प्रसिद्धी चारी दिशेला पसरली होती.
त्याकाळी दौलताबाद ही निजामशाहची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा एक वजीर होता. तो देखील शुर आणि कर्तबगार होता. वेरूळ हे ठिकाण दौलताबादपासून जवळच होते. भोसले बंधूंचे पराक्रम मलिक अंबर जाणून होता.
वारंवार निजामशाहीवर होणारे उत्तरेकडील मुघल आक्रमण थोपवण्यासाठी या दोघांची मदत होऊ शकते हे मलिक अंबर जाणून होता. त्याने निजामशाहला याबद्दल माहिती दिली आणि त्या दोघांबद्दल शिफारसही केली. निजामशाहने मग या भोसले सरदारांना पुणे आणि सुपे परगण्यांच्या जहागिरी दिल्या.
King of all World : छत्रपती श्री शिवाजी महाराज
फलटणच्या निंबाळकर घराण्यातील उमाबाई या मालोजीराजे यांच्या पत्नी होत. या दाम्पत्याला शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुले होती. ज्यावेळी इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले त्यावेळी शहाजीराजे पाच वर्षाचे होते.
त्यानंतर त्यांचे बंधू विठोजी राजे यांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला.दिवस छान चालले होते. शहाजी आणि शरीफजी दोघे पराक्रमी बनत चालले होते. शस्त्र चालवण्यात तरबेज झाले होते.
विठोजी राजे यांनी निजामशाहीतील आणखी एक शूर मराठा सरदार लखुजीराव जाधव यांच्या मुलीसाठी शहाजीराजे यांचे स्थळ सांगितले. लखुजीराव हे खूप मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशाहच्या दरबारी त्यांचा खूप मोठा मान होता.
लखुजीराव जाधव यांची मुलगी म्हणजे जिजाबाई. जिजाबाई या हुशार आणि सुलक्षणी होत्या.
विठोजी राजे आणि लखुजीराव हे दोघे शूरवीर होतेच शिवाय मराठा सरदार एकवटले जावेत या उद्देशाने शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह करवून देण्यात आला. हा विवाह खूप उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. जिजाबाई आता भोसले घराण्याची सून झाली होती.
शहाजीराजे पराक्रमी होतेच. त्याची ख्याती निजामशाह ओळखून होता. मालोजीराजे यांची जहागिरी काही काळानंतर शहाजीराजे यांच्यावर सोपवण्यात आली. मुघल सम्राट निजामशाही जिंकण्याच्या बेतात होता. त्याने विजापूरचा आदिलशाह याला मदतीचा हात मागितला. मग दोघांच्या करारावरून त्यांनी निजामशाहीवर आक्रमण केले.
शहाजीराजे, शरीफजी आणि वजीर मलिक अंबर हे निकराने लढले. त्यांनी या दोन्ही फौजांचा पराभव केला. ही लढाई अहमदनगरजवळ भातवडी येथे झाली. या लढाईत शरीफजी ठार मारले गेले.या लढाईनंतर शहाजीराजे यांचा मान आणि प्रतिष्ठा वाढली.
खुद्द निजामशाह त्यांच्यावर खूप खुश होता. आता मलिक अंबर मात्र त्यांच्यावर जळू लागला होता. त्या दोघात वितुष्ट निर्माण झाले. पुढे निजामशाहीत पुन्हा वाद नको म्हणून शहाजीराजे निजामशाहीतून बाहेर पडले. त्यांची पुढे खरी पदोन्नती आदिलशाहीत झाली. आदिलशाहने त्यांना सरलष्कर ही पदवी बहाल केली. आता इकडे निजामशाहीचा उतरता काळ सर्वजण पाहत होते.
वजीर अंबर मलिक मृत्यू पावला होता. त्याचा मुलगा फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. अंबर मलिक नंतर तो निजामशाहीत वजीर बनला. त्याचा कारभार पाहता मुघलांचे पुन्हा एकदा आक्रमण होईल अशी भीती निर्माण झाली.
खुद्द निजामशाहच्या आईने शहाजीराजांना पुन्हा निजामशाहीत कार्यरत होण्यासाठी सांगितले. वजीर अंबर मलिकचा मृत्यू झाला असल्याने शहाजीराजांच्या नकाराचे काही कारण नव्हते. आता शहाजीराजे पुन्हा निजामशाहीत सेवेसाठी रुजू झाले.
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८० )
हे इ. स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे, शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला ‘शिवकाल‘ असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.
आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला.
महाराष्ट्र शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.
त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात.
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी‘ ठेवले गेले.