Live A Heart-Healthy Lifestyle 7 Strategies For Daily Routine : तुमचं हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी या ७ गोष्टी नियमित करा …!

आज जागतिक हृदय दिवस निमित्ताने हा विशेष लेख हार्ट अटॅक हे नाव ऐकलं तरी क्षणभर भीती वाटते ना? पण आधुनिक जीवनशैलीमुळे हा रोग तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. वयोवृद्ध व्यक्तींपेंक्षा तरुण लोकांना याचा धोका वाढला आहे.
Live a Heart-Healthy Lifestyle 7 Strategies For Daily Routine : तुमचं हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी या ७ गोष्टी नियमित करा …!

Live A Heart-Healthy Lifestyle 7 Strategies For Daily Routine : तुमचं हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी या ७ गोष्टी नियमित करा …! – आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव, बैठी कामे, व्यायामाचा अभाव, जेवणखाण्याच्या अनियमित वेळा, यामुळे खूपदा तरुणांना मधुमेह -हृदयविकार असे आजार झालेले आढळतात.

काय असतो हा हार्ट अटॅक? सोप्या शब्दात सांगायचं तर, हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला की जो धक्का बसतो तो हृदयाला. तोच‌ हार्ट अटॅक!!!
पण तज्ज्ञ लोकांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचे पालन केले असता हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालू राहते आणि हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो.

योग्य आहार-

योग्य आहार घेणं म्हणजे जे जीभेला आवडतं तेच न खाता शरीराला उपयुक्त असलेलं अन्न खाणे. चीज, बर्गर हे पदार्थ दिसायला छान दिसतात पण त्याचं अतिसेवन घातक आहे.

यातील सॅच्युरेटेड फॅट्स मुळे धमनी काठीण्य, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त होऊन हृदयविकार होण्याची शक्यता बळावते, म्हणून असे पदार्थ टाळावेत.
लोणी, चीज, बर्गर यांचं सेवन‌ मर्यादित प्रमाणात करावं.

अनसॅच्युरेटेड फॅट्स युक्त आहार-

अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे असा आहार ज्यात सॅच्युरेटेड फॅट्स नसतील. उदा. तीळ तेल, सोयाबीन तेल, शेंगतेल इत्यादी.
यातील पौष्टिक घटकांमुळे आरोग्य चांगले राहाते व हृदयविकाराच्या त्रासाला टाळता येऊ शकते.

Live a Heart-Healthy Lifestyle 7 Strategies For Daily Routine : तुमचं हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी या ७ गोष्टी नियमित करा …!

Live A Heart-Healthy Lifestyle 7 Strategies For Daily Routine : तुमचं हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी या ७ गोष्टी नियमित करा …!

व्यायाम –

सायकलिंग, टेनिस खेळणे आणि इतर वर्क आऊट अशा व्यायामाने तुमची रक्ताभिसरण संस्था सुधारते आणि हृदयविकाराच्या त्रासाची शक्यता कमी होते.
साधारण पणे ४५ मिनीटे ते एक तास नियमितपणे व्यायाम करणे हा आरोग्याचा मंत्र आहे.
सतत एका जागी बसून राहण्यानेही शरीर स्थूल बनते आणि वजन वाढीला लागले की, त्या अनुषंगाने इतर अनेक रोगांची लक्षणे दिसतात.

जसे मधुमेह हृदयविकार इ. म्हणून एका जागी सतत बसून राहू नये.

फळे व भाजीपाला-

फळे व पालेभाज्या यांच्या सेवनाने जी पोषणमूल्यं मिळतात ती असतात मिनरल्स- खनिजे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे शक्य होते.

साखरेचे प्रमाण कमी-

आहारातील साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. अमेरिकन हार्ट असोसिएशननं सांगितले आहे की, स्त्रियांनी दिवसाला फक्त सहा चमचे साखर सेवन करा व ९ चमचे साखर पुरुषांनी सेवन करावी.
त्याहून जास्त साखर खाणे हे अनिष्ट परिणाम करते. अति साखर खाणे हे रोगांना आमंत्रण असते. म्हणून डाॅक्टर मधुमेही लोकांना साखर टाळायलाच सांगतात.

मीठाचा मर्यादित वापर-

वेफर्स किंवा तत्सम पदार्थ ज्यात मीठाचे प्रमाण अधिक असते, असे पदार्थ खाल्ल्याने शरीरात सोडीयमचे प्रमाण जास्त होते.

हृदयावर कामाचा म्हणजे रक्त शुद्ध करण्याचा ताण वाढतो. तो होऊ नये यासाठी मीठ कमी खा.
ज्या पदार्थांत मीठाचा मुक्त वापर केला जातो असे खारट पदार्थ टाळा.

मद्यपान कमी करा-

मद्यपानाने हृदयविकाराचा धोका वाढतो. अतिमद्यपान रक्तदाब वाढवते. रक्तदाब वाढणं हीच ह्रदयविकाराचा झटका येण्याची सूचना असते.
दिवसातून एकच ग्लास वाईन ही ठीक आहे पण जर तुम्ही दारु घेतच नसाल तर फार उत्तम आहे. कधीच घेऊ नका.

हे सुद्धा वाचा :-

आणखी माहिती साठी :- Heart Health

५ उत्तम योगासने तुम्ही कशी करू शकता ?

Leave a Reply