Maharashtra Din : 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.
Maharashtra Din | महाराष्ट्र दिन:
- महाराष्ट्र दिन महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
- महाराष्ट्र दिन मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
- या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
- महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते.
- 1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले.
- 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.
- या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.
- शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
- या दिनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.
जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि श्री प्रकाश 1 मे 1960 रोजी राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राच्या नवीन राज्याच्या नकाशाचे अनावरण करताना.
Kamgar Din | 1 मे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक कामगिरी..
Maharashtra Din History | महाराष्ट्र दिनाचा इतिहास
- 21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसं प्रचंड चिडली होती.
- सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.
- त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाऊंटनकडे जमला.
- मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला.
- गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
Chatrapati Shree Shivaji Maharaj Ki Jai In Mauritius: शिवछत्रपतींचा जयघोष मॉरिशसमध्ये घुमला-राजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
107 आंदोलकांचं हौतात्म्य:
- स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता.
- त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड त्यावेळ धुमसत होती.
- त्यामुळे 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला.
- यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठीण झाले.
- त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. परंतु,जमाव पांगला नाही. त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 106 आंदोलकांना हौतात्म्य आलं.
Raigad Fort ‘Mavala Swarajyacha’ Organization Found Unrecognized Cave: ‘मावळा स्वराज्याचा’ प्रतिष्ठानला किल्ले रायगडावर अपरिचित गुहा दर्शन
हुतात्म्यांची नावे:
२१ नोव्हेंबर इ. स. १९५६ चे हुतात्मे
- सिताराम बनाजी पवार
- जोसेफ डेव्हिड पेजारकर
- चिमणलाल डी. शेठ
- भास्कर नारायण कामतेकर
- रामचंद्र सेवाराम
- शंकर खोटे
- धर्माजी गंगाराम नागवेकर
- रामचंद्र लक्ष्मण जाधव
- के. जे. झेवियर
- पी. एस. जॉन
- शरद जी. वाणी
- वेदीसिंग
- रामचंद्र भाटीया
- गंगाराम गुणाजी
- गजानन ऊर्फ बंडू गोखले
- निवृत्ती विठोबा मोरे
- आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
- बालप्पा मुतण्णा कामाठी
- धोंडू लक्ष्मण पारडूले
- भाऊ सखाराम कदम
- यशवंत बाबाजी भगत
- गोविंद बाबूराव जोगल
- पांडूरंग धोंडू धाडवे
- गोपाळ चिमाजी कोरडे
- पांडूरंग बाबाजी जाधव
- बाबू हरी दाते
- अनुप माहावीर
- विनायक पांचाळ
- सिताराम गणपत म्हादे
- सुभाष भिवा बोरकर
- गणपत रामा तानकर
- सिताराम गयादीन
- गोरखनाथ रावजी जगताप
- महमद अली
- तुळशीराम पुंजाजी बेलसरे
- देवाजी सखाराम पाटील
- शामलाल जेठानंद
- सदाशिव महादेव भोसले
- भिकाजी पांडूरंग रंगाटे
- वासुदेव सुर्याजी मांजरेकर
- भिकाजी बाबू बांबरकर
- सखाराम श्रीपत ढमाले
- नरेंद्र नारायण प्रधान
- शंकर गोपाल कुष्टे
- दत्ताराम कृष्णा सावंत
- बबन बापू भरगुडे
- विष्णू सखाराम बने
- सिताराम धोंडू राडये
- तुकाराम धोंडू शिंदे
- विठ्ठल गंगाराम मोरे
- रामा लखन विंदा
- एडवीन आमब्रोझ साळवी
- बाबा महादू सावंत
- वसंत द्वारकानाथ कन्याळकर
- विठ्ठल दौलत साळुंखे
- रामनाथ पांडूरंग अमृते
- परशुराम अंबाजी देसाई
- घनश्याम बाबू कोलार
- धोंडू रामकृष्ण सुतार
- मुनीमजी बलदेव पांडे
- मारुती विठोबा म्हस्के
- भाऊ कोंडीबा भास्कर
- धोंडो राघो पुजारी
- ह्रुदयसिंग दारजेसिंग
- पांडू माहादू अवरीरकर
- शंकर विठोबा राणे
- विजयकुमार सदाशिव भडेकर
- कृष्णाजी गणू शिंदे
- रामचंद्र विठ्ठल चौगुले
- धोंडू भागू जाधव
- रघुनाथ सखाराम बीनगुडे
- काशीनाथ गोविंद चिंदरकर
- करपैया किरमल देवेंद्र
- चुलाराम मुंबराज
- बालमोहन
- अनंता
- गंगाराम विष्णू गुरव
- रत्नु गोंदिवरे
- सय्यद कासम
- भिकाजी दाजी
- अनंत गोलतकर
- किसन वीरकर
- सुखलाल रामलाल बंसकर
- पांडूरंग विष्णू वाळके
- फुलवरी मगरु
- गुलाब कृष्णा खवळे
- बाबूराव देवदास पाटील
- लक्ष्मण नरहरी थोरात
- ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
- गणपत रामा भुते
- मुनशी वझीऱअली
- दौलतराम मथुरादास
- विठ्ठल नारायण चव्हाण
- देवजी शिवन राठोड
- रावजीभाई डोसाभाई पटेल
- होरमसजी करसेटजी
- गिरधर हेमचंद लोहार
- सत्तू खंडू वाईकर
- गणपत श्रीधर जोशी
- माधव राजाराम तुरे(बेलदार)
- मारुती बेन्नाळकर
- मधूकर बापू बांदेकर
- लक्ष्मण गोविंद गावडे
- महादेव बारीगडी
- कमलाबाई मोहिते
- सीताराम दुलाजी घाडीगावकर
- शंकरराव तोरस्कर