Maha DES Recruitment 2023 : ०५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरतीसाठी पात्र असलेले सर्व उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करू शकतात. महाराष्ट्र राज्यात एकूण २६० रिक्त पदे भरण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालय मार्फत जाहिरात प्रदर्शित केली आहे.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती माहिती – Maha DES Recruitment 2023
Maharashtra-MAHA DES Recruitment 2023 : महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ – महाराष्ट्र राज्यात कडून एकूण २६० रिक्त पदे भरण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालय मार्फत ही भरतीची जाहिरात प्रदर्शित केली आहे. अर्थ व सांख्यिकी भरतीचे इतर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, वेतन व अभ्यासक्रम खालीलप्रमाणे :-
पद भरती : Post Recruitment
पद भरती नाव | रिक्त जागा |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | ३९ |
सांख्यिकी सहाय्यक गट क | ९४ |
अन्वेषक गट क | १२७ |
एकूण | २६० |
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती शैक्षणिक पात्रता : Education Qualification
वयोमर्यादा – १८ ते ३८ (इतर नियमानुसार सूट)
Post | Education Qualification |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | अ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा ब] मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (I. S. I.) किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद (I.C.A.R.) किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका. |
सांख्यिकी सहाय्यक गट क | अ] मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी. किंवा ब] मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स यापैकी एक विषय घेवून द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी. |
अन्वेषक गट क | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. |
निवड प्रक्रिया : Selection Process
- ऑनलाईन परीक्षा – पात्र उमेदवारांची २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा TCS कंपनी द्वारे घेण्यात येणार आहे.
- परीक्षा निकाल
- कागदपत्रे तपासणी
परीक्षा स्वरूप : Exam format
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
१. | मराठी भाषा | ५० | ५० |
२. | इंग्रजी भाषा | ५० | ५० |
३. | सामान्य ज्ञान | ५० | ५० |
४. | बौद्धिक चाचणी | ५० | ५० |
एकूण | २०० | २०० |
अर्ज करण्याची तारीख : Important Dates
१३ जुलै ते ०५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया असणार आहे.
वन विभागाचे अधिकृत संकेतस्तळं : Official Website
–> https://mahades.maharashtra.gov.in/
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख ?
०५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया असणार आहे.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती ऑनलाईन परीक्षा किती गुणांची आहे ?
२०० गुणांची ऑनलाईन परीक्षा TCS कंपनी द्वारे घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती शैक्षणिक पात्रता कोणकोणती आहे ?
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क आणि अन्वेषक गट क यासाठी असणार आहे.
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती शैक्षणिक वयोमर्यादा किती ?
वयोमर्यादा – १८ ते ३८
हे सुद्धा वाचा :-