Mahatma Jyotiba Phule Amuly Vichar : स्त्री शिक्षण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर समाधीचा शोध

Mahatma Jyotiba Phule (११ एप्रिल) : महाराष्ट्रासह देशातील सर्वांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करणारे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजासारखा सत्याचा आग्रह धरणारा पर्याय देखील इथल्या जनतेपुढं मांडला.
Mahatma-Jyotiba Phule-Amuly-Vichar-:-स्त्री-शिक्षण-ते-छत्रपती-शिवाजी-महाराजांच्या-रायगडावर-समाधीचा-शोध

Mahatma Jyotiba Phule Amuly Vichar : स्त्री शिक्षण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर समाधीचा शोध –

महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या देशातील महान समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते.

जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह इत्यादी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला.

स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला. आयुष्यातील अनेक संघर्षांनंतर महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रकृती ढासळू लागली.

२८ नोव्हेंबर १८९० रोजी पुण्‍यात प्रदीर्घ आजाराने त्‍यांचे निधन झाले.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे अमूल्य विचार, तुमचे जीवन बदलण्यासाठी मदत करलं.

Mahatma-Jyotiba Phule-Amuly-Vichar-:-स्त्री-शिक्षण-ते-छत्रपती-शिवाजी-महाराजांच्या-रायगडावर-समाधीचा-शोध
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, पुणे.

सत्यशोधक : महात्मा ज्योतिबा फुले

  • महात्मा फुले यांचा ११ एप्रिल १८२७ रोजी जन्म
  • स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा
  • स्त्री शिक्षणासाठी व्यापक कार्य
  • शेतकऱ्यांच्या आसूडमधून व्यापक मांडणी
  • अस्पृश्यता विरोधी जाहीरनामा मांडला
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार
  • महात्मा फुले यांचे विचार देतील प्रेरणा

Mahatma Jyotiba Phule Amuly Vichar : ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला.
त्यांना महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी जातीवादाच्या विरोधात अनेक चळवळी सुरू केल्या. शेतकरी, कनिष्ठ जाती आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी लढा दिला.
समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती. त्यांनी आयुष्यभर मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी अनेक चळवळी केल्या.
भारतातील पहिले हिंदू अनाथाश्रम स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. जाणून घेऊया महानायक महात्मा ज्योतिबा फुले यांचे अमूल्य विचार.

  • शिक्षण ही स्त्री आणि पुरुषाची प्राथमिक गरज आहे.
  • आपल्या आयुष्यात रोज नवनवीन कल्पना येतात, पण खरी धडपड ती प्रत्यक्षात आणण्यातच असते.
  • अन्न आणि विवाहावर जातीय निर्बंध कायम असे पर्यंत भारतातील राष्ट्रीय भावना मजबूत होणार नाही.
  • जगाचा निर्माता विशिष्ट दगड किंवा विशिष्ट ठिकाणी मर्यादित असू शकत नाही.
  • देव एक आहे आणि तो सर्व लोकांचा कर्ता आहे.
  • जात आणि लिंगाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव करणे हे मोठे पाप आहे.
  • चांगले काम करण्यासाठी कधीही चुकीच्या उपायांचा अवलंब करू नका.
  • कोणी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करत असेल तर त्याच्यापासून दूर जाऊ नका.
  • तुमच्या संघर्षात सामील झालेल्यांची जात विचारू नका.
  • स्वार्थ कधी जातीचा तर कधी धर्माचा वेगवेगळा प्रकार घेतो.
  • शिक्षणाशिवाय शहाणपणा गेला. शहाणपणाशिवाय नैतिकता गेला. नैतिकतेशिवाय विकास गेला.
  • संपत्तीविना शूद्र नाश पावला. शिक्षण महत्त्वाचे आहे.
  • सर्व प्राण्यांमध्ये पुरुष सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व मानवांमध्ये स्त्री सर्वश्रेष्ठ आहे. स्त्री आणि पुरुष जन्मतःच मुक्त आहेत, त्यामुळे दोघांनाही सर्व हक्क समानतेने उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे.
  • जीवनाची गाडी केवळ दोन चाकांवर चालत नाही, त्याला वेग तेव्हाच मिळतो जेव्हा मजबूत दुवे जोडले जातात.
  • धर्म म्हणजे जो समाजाच्या हिताचा, समाजाच्या हिताचा आहे, जो धर्म समाजाच्या हिताचा नाही तो धर्म नाही.
Mahatma-Jyotiba Phule-Amuly-Vichar-:-स्त्री-शिक्षण-ते-छत्रपती-शिवाजी-महाराजांच्या-रायगडावर-समाधीचा-शोध

Mahatma Jyotiba Phule Amuly Vichar : स्त्री शिक्षण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर समाधीचा शोध

महात्मा जोतीराव फुले यांची जयंती दरवर्षी महाराष्ट्रासह देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत असते. महात्मा फुले यांचा जन्म गोविंदराव फुले आणि चिमणाबाई फुले या दाम्पत्याच्या पोटी ११ एप्रिल १८२७ रोजी झाला.
महाराष्ट्रासह देशभर सुरु असलेल्या कित्येक चळवळींची प्रेरणा म्हणून सर्व जण महात्मा फुले यांना अभिवादन करतात. स्त्री शिक्षणाद्वारे महात्मा फुले यांनी “स्त्रीशूद्रातिशूद्र म्हणजेच उपेक्षित समाजाला” ज्ञानाचा मार्ग खुला करुन दिला.
शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथांच्या माध्यमातून शेतीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग महात्मा फुले यांनी मांडला. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून महाराजांचा जातीपाती विरहित विचार गावोगावी नेला.
महात्मा फुले यांनी सत्यावर विश्वास ठेवणारा समतामूलक समाज निर्माण करावा या उद्देशानं सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली. समाज व्यवस्थेतील दोषांवर केवळ बोट न ठेवता कृतीशील पर्याय देखील देण्याचं काम त्यांनी दिलं.
महात्मा फुले यांचा विवाह १८४० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. हा विवाह मोठ्या थाटामाटात झाल्याची नोंद आहे.

Mahatma-Jyotiba Phule-Amuly-Vichar-:-स्त्री-शिक्षण-ते-छत्रपती-शिवाजी-महाराजांच्या-रायगडावर-समाधीचा-शोध

शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं –

महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
शाळा सुरु केल्यानंतर काही अडचणी निर्माण झाल्या. सावित्रीबाई फुले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. जोतिबा फुले यांनी त्यांना काही दिवस घरीच शिकवलं.
पुढे सावित्रीबाई फुले यांनी अहमदनगर येथे मिसेस फरार आणि पुणे येथे मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचं शिक्षण पूर्ण केलं. फातिमा शेख या देखील अध्यापनाचं काम करत होत्या.
त्यांनी ज्ञानाची आणि विद्येची महती इथल्या समाजमनावर बिंबवण्याचं काम केलं. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वत्रिक आणि सक्तीचं करावी, अशी पहिली मागणी केली.
हंटर कमिशनपुढं त्यांनी दिलेलं शिक्षणाबाबतचं निवेदन हा देखील महत्त्वाचा भाग आहे.

Mahatma-Jyotiba Phule-Amuly-Vichar-:-स्त्री-शिक्षण-ते-छत्रपती-शिवाजी-महाराजांच्या-रायगडावर-समाधीचा-शोध

स्त्री-शूद्रातिशूद्रांना शोषणातून बाहेर काढायचं असेल शिक्षणाचा प्रसार महत्त्वाचा आहे” हे ओळखून महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्रात काम सुरु केलं.

विद्येविना मति गेली | मतिविना नीति गेली ||
नीतिविना गति गेली | गतिविना वित्त गेले ||
वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||

या ओळींतून महात्मा फुले यांनी, “मनुष्याकडे शिक्षण नसेल तर काय अनर्थ होतात” हे सांगितलं आहे.

थोडे दिन तरी मद्य वर्ज करा | तोच पैसा भरा | ग्रंथासाठी ||
ग्रंथ वाचताना मनी शोध करा | देऊं नका थारा | वैरभावा ||

या ओळीतून, “व्यसनापासून दूर राहून म्हणजेच दारु सोडून देऊन त्यावर खर्च होणारा पैसा हा ग्रंथांसाठी म्हणजेच पुस्तकासाठी वापरण्याचा संदेश” महात्मा फुले यांनी दिला आहे.

Mahatma-Jyotiba Phule-Amuly-Vichar-:-स्त्री-शिक्षण-ते-छत्रपती-शिवाजी-महाराजांच्या-रायगडावर-समाधीचा-शोध


ग्रंथ वाचताना तु्म्ही आत्मशोध घेण्याची गरज असल्याचं ते म्हणतात. तुमच्या मनात वैरभावाला थारा द्यायला नको, असा सल्ला देखील ते देतात.

स्त्री मुक्तीसाठी व्यापक कार्य –

स्त्री शिक्षणाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर महात्मा फुले तेवढ्यावरच थांबले नव्हते. त्यांनी पुढे जाऊन विधवा विवाहांना प्राधान्य दिलं. १८५५ मध्ये महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला.
८ मार्च १८६० रोजी शेणवी जातीतील पुनर्विवाह त्यांनी गोखल्यांच्या बागेत घडवून आला. पुढे २५ जुलै १८५६ ला सरकारनं विधवा विवाहाचा कायदा केला.
दुसरीकडे विधवांचं केशवपन करुन त्यांना विद्रूप केलं जाऊ नये या भावनेतून महात्मा फुले यांनी पुण्यात नाभिकांचा संप घडवून आणला. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना देखील त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार –

महात्मा फुले यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर होता. कुळवाडी भूषण, शूद्रातिशुद्रांचा राजा, रयतेचा राजा असा गौरव ते महाराजांचा करतात.
रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी महात्मा फुले गेले होते. रायगडावर समाधीचा शोध त्यांनी घेतला. वाढलेली झाडं झुडपं तोडून टाकली.
तिथं घडलेला प्रसंग देखील आज देखील चर्चेत असतो. तिथून परत आल्यावर महात्मा फुले यांनी शिवजयंती महोत्सव मंडळाचा विचार मांडला. १८६७ मध्ये त्याला मूर्त स्वरुप आलं.

महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी १८६८ मध्ये स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. पुढं जाऊन अस्पृश्यता विरोधी जाहीरनामा देखील मांडला.

सत्यशोधक समाजाची स्थापना –

महात्मा जोतिबा फुले यांनी विविध भागात दौरे केल्यानंतर २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची पुण्यात स्थापना करण्यात आली.

यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ११ मे १८८८ रोजी मुंबईतील भायखळ्यातील मांडवी येथील कोळवाडी सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभागृहात त्यांना जनतेनं महात्मा ही पदवी प्रदान केली.

महात्मा फुले यांनी तृतीयरत्न हे नाटक, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा, ब्राह्मणांचे कसब, इशारा, सत्सार १ आणि २ यासह विविध ग्रंथांचं लेखन केलं.

Leave a Reply