उन्हाळ्यात स्वतः बनवा २ मिनिटात मसाला ताक…


Masala Taak Gharchya Ghari-उन्हाळ्यात मसाला ताकाने ठेवा स्वताला फ्रेश-आरोग्यासाठी उत्तम-चवीला चटकदार-झटपट रेसिपी.. – कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी थंड पदार्थाचे सेवन आपण करतोच, उन्हाळ्याच्या झळा लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना सोसाव्या लागत आहेत. दुसरीकडे थंडगार शीतपेयांचा वापर वाढला आहे.
ज्यात ताक, लस्सी, आईस्क्रीम, सरबत या पदार्थांचा समावेश आहे. त्यातील एक उत्तम पर्याय म्हणजे थंडगार ‘ताक‘. ताक हे थंड पेय आपण उन्हाळ्यात हमखास पितो.
ताक पिण्याचे फायदे :
- ताकामध्ये दह्याची मात्रा खूप कमी आणि पाण्याची मात्रा जास्त असते.
- कारण दह्यातील उत्तम बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक अॅसिड पचनसंस्था सुधारते.
- ताक पचनशक्ती सुधारण्याचे कार्य करते, ज्यामुळे आतड्यांना आराम मिळतो.
- ज्यांना व्यक्तीना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते.
मसाला ताक हे पेय महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. जर कडक उन्हातून घरी आल्यावर थंडगार प्यायला मिळालं तर? मग स्वतः घरच्याघरी काही क्षणातच थंडगार ताक बनवा. जाणून घ्या कसे बनवायचे झटपट थंडगार मसाला ताक –

मसाला ताक सर्वउत्तम घरच्या घरी…
Masala Taak Gharchya Ghari-उन्हाळ्यात मसाला ताकाने ठेवा स्वताला फ्रेश-आरोग्यासाठी उत्तम-चवीला चटकदार-झटपट रेसिपी..
थंडगार मसाला ताक बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
- १ लिटर ताक
- १/४ टीस्पून काळी मिरी पावडर
- २ ग्लास थंडगार पाणी
- १ छोटा चमच काळे आणि साधे मीठ
- १ चमच साखर
- १ चमच धने
- पुदिना १०-१५ पाने
- आले
- लसूण ४-५ पाकळ्या
- जिरे अर्धा चमच
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- चाट मसाला / ताक मसाला
- बर्फाचे २-३ छोटे- छोटे तुकडे
‘मसाला ताक‘ हे पेय महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे.

हे सुद्धा वाचा :- बहुतांश वेळा असे पदार्थ आरोग्यास अहितकारकच असतात.
कसे बनवायचे झटपट थंडगार मसाला ताक –
- सर्वप्रथम, एका मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, जिरे, हिरवी मिरची, हवे असल्यास-साखर, धने, आले, लसूण, कोथिंबीर आणि चवीनुसार-काळे अणि साधे मीठ घालावे.
- मिश्रण करत असताना त्यात थोडे पाणी मिक्स करा. जेणेकरून मिश्रण चांगलं तयार होईल.
- आता एका भांड्यात एक लिटर ताक म्हणजेच (बटर मिल्क) घ्या, त्यात तयार केलेले हिरवे मिश्रण टाका.
- त्यानंतर त्यात काळी मिरी पावडर, काळे मीठ, चाट मसाला घालून चमचने मिक्स करा.
- आपण आपल्या चवीनुसार ताक मसाला किंवा चाट मसाला अधिक घालू शकता.
- यानंतर तयार झालेल्या ताकात बर्फाचे २-३ छोटे- छोटे तुकडे घालून तयार…
मिक्सरपेक्षा चमचने मिक्स केल्यास मसाला ताक अधिक चवीला उत्तम लागेल. अशा प्रकारे झटपट, कमी साहित्यात आपले मसाला ताक पिण्यासाठी तयार…(Masala Taak Gharchya Ghari)