Pandharpur Wari 2023 – Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 29 june 2023  muhurta puja vidhi and importance of devshayani ekadashi Pandharpur, maharashtra
Pandharpur Wari 2023 - Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व

Pandharpur Wari 2023 – Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व – आषाढी एकादशी म्हणजेच “देवशयनी एकादशी”. विठुरायाचे सावळे रुप डोळ्या सामावून घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरात इंद्रायणी काठी दरवर्षी एकत्र जमतात.

आषाढी एकादशीला महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्व आहे. गुरुवारी २९ जून २०२३ या दिवशी आषाढी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे.

मृत्यूलोकीं एक नगर त्याचे नाव पंढरपूर

प्रत्येक महिन्यात २ एकादशी असतात म्हणजे वर्षाला २४ एकादशी असतात. पण यंदा चातुर्मास म्हणजेच अधिमास आल्यामुळे दोन एकादशी जास्त येणार आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षाला येणाऱ्या एकादशीला आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजेला विशेष महत्त्व आहे.

देवशयनी एकादशीचे महत्त्व (Importance of Devashyani Ekadashi) –

Pandharpur Wari 2023 - Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मानवाची एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. तर “दक्षिणायन” ही देवाची रात्र तर, “उत्तरायण” ही देवाचा दिवस असतो.

कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. म्हणजे देव झोपी जातात. म्हणून या एकादशीला “देवशयनी एकादशी” असं म्हणतात.

आषाढी एकादशी मुहूर्त –

Pandharpur Wari 2023 - Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व

उदय तिथीनुसार यावर्षी आषाढी एकादशी २९ जून दिवशी साजरी करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी २९जूनला पहाटे ०३:१८ वाजता सुरु होणार असून ३० जून दिवशी दुपारी ०२:४२ वाजेपर्यंत असणार आहे.

आषाढी एकादशीची पूजाविधी (Worship of Ashadhi Ekadashi) –

  • आषाढी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं.
  • ब्रह्ममुहूर्त – सूर्योदयाच्या १ तास ३६ मिनिटे आधी सुरू होतो. ब्रह्ममुहूर्ताचा कालावधी ४८ मिनिटांचा असून सूर्योदयाच्या ४८ मिनिटांपूर्वी संपतो.
  • त्यानंतर विष्णू देवाला आणि विठुरायाला तुळस वाहून पूजा करुन व्रत करण्याचं संकल्प घ्यावा.
  • विठ्ठल नामाचा जयघोष करत पूर्ण दिवस देवाच्या नामस्मरण करावं.
  • पंढरपूरमध्ये यादिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती करुन विठुरायाचा भक्तीत दंग होतात.
  • या दिवशी म्हणजे दशमीच्या अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा.

आषाढी एकादशीची कथा आणि ती कधी पासून सुरू झाली ?

Vitthal Temple Pandharpur Maharashtra

Pandharpur Wari 2023 - Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व

पुरातन काळापासून आषाढी एकादशीची ही कथा सांगण्यात येते. त्या कथेत म्हटलं आहे की, सत्ययुगात मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट होता. त्याच्या राज्यात प्रजा आनंदाने राहायची.

पण त्या राज्यात एक वेळ अशी आली की, सलग ३ वर्षे पाऊस पडला नाही. प्रजेवर संकट कोसळलं, राजाही अस्वस्थ झाला. एकेदिवशी यावर उपाय शोधण्यासाठी राजा जंगलात निघून गेला.

जंगलात वनवन भटकत असताना त्याला अंगिरा ऋषींचं आश्रम दिसलं. राजाने ऋषीकडे व्यथा मांडली. त्यावर राजाला ऋषीने उपाय सुचवला.

अंगिरा ऋषीं म्हणाले की, राज्यात जाऊन देवशयनी एकादशीचं व्रत खऱ्या मनाने आणि विधिपूर्वक करा. त्यामुळे, राज्यात नक्की पाऊस पडेल.

राजा आपल्या राज्यात परतला आणि त्याने हे व्रत नियमानुसार केलं. त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून वरुणराजाला खूष करण्यासाठी हे व्रत पाळलं जातं आहे.

Pandharpur Wari 2023 - Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व

Pandharpur Wari 2023 – Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व

भेटी लागी जीवा..!

देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा…

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,
भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…

विठ्ठल भजन

हे सुद्धा वाचा :-

Puducherry Jinji Fort India

देवशयनी एकादशी म्हणजे काय?

Pandharpur Wari 2023 - Why do people walk to see Pandharpur Vitthal? : २०२३ आषाढी देवशयनी एकादशीला का चालत जातात? एकादशी मुहूर्त आणि महत्त्व

कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. म्हणजे देव झोपी जातात. म्हणून या एकादशीला “देवशयनी एकादशी” असं म्हणतात.

ब्रह्ममुहूर्त कधी असतो?

सूर्योदयाच्या १ तास ३६ मिनिटे आधी सुरू होतो. ब्रह्ममुहूर्ताचा कालावधी ४८ मिनिटांचा असून सूर्योदयाच्या ४८ मिनिटांपूर्वी संपतो.

आषाढी एकादशीला कधी स्नान करावे?

आषाढी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं.

प्रत्येक महिन्यात किती एकादशी असतात ?

प्रत्येक महिन्यात २ एकादशी असतात म्हणजे वर्षाला २४ एकादशी असतात.

आषाढी एकादशी कोणत्या एकादशीला म्हणतात?

पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षाला येणाऱ्या एकादशीला आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी असे म्हणतात.

Leave a Reply