Pune Ring Road Land Acquisition: भूसंपादनाला मिळणार गती-बाधित जमीनदारांना मिळणार १० हजार ५२० कोटी – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोड चे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ संपूर्ण राज्यात वेगवेगळे रस्ते विकासाची कामे करत आहे.
Pune Ring Road Land Acquisition: भूसंपादनाला मिळणार गती-बाधित जमीनदारांना मिळणार १० हजार ५२० कोटी – राज्य रस्ते विकास महामंडळाला पुणे रिंग रोडचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुचित केले जात आहे.

पुणे रिंग रोडचे काम जलद गतीने...
पुणे रिंग रोड बद्दल माहिती –
- पुणे रिंग रोड चे काम २ टप्प्यात, पूर्व व पश्चिम अशा २ भागात या रिंग रोडचे काम विभागण्यात आले आहे.
- रिंग रोड ची एकूण लांबी १७३ किलोमीटरची असून यासाठी २८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होणार आहे.
- केवळ भूसंपादनासाठी दहा हजार ५२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- दरम्यान, या प्रकल्पासाठी हुडकोकडून मदत मिळाली असुन,
- साडेतीन हजार कोटी (३,५००) रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असून यासाठी राज्य शासनाने हमी देखील दिली आहे.
- त्यामुळे, पुणे रिंग रोड चे काम जलद गतीने पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- विशेषता पुणे रिंग रोड साठी आवश्यक भूसंपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे सुद्धा वाचा :-
अजित दादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार –
अजित दादा पवार यांच्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांतील वाहतूक कोंडी कमी होण्यास रिंगरोडमुळे मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, की पुणे रिंग रोडचे भूसंपादन लवकरात लवकर व्हावे आणि या प्रकल्पाचे प्रत्येक्ष काम लवकर सुरू होऊन हा रिंग रोड पुणेकरांच्या सेवेत दाखल व्हावा यासाठी, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील पाठपुरावा सुरू केला आहे.
अजित दादा पवार यांनी, सरकारकडे पुणे रिंग रोडचे भूसंपादन जलद गतीने पूर्ण केले जावे अशी मागणी केली आहे.
एकंदरीत पुणे रिंग रोडसाठी कर्जाची उभारणी झाली असल्याने आणि शासन तसेच विरोधी पक्षातील नेते या रिंग रोड साठी अनुकूल असल्याने लवकरच रिंग रोडचे काम मार्गी लागेल असे चित्र सध्या उपस्थित होत आहे.
अहमदनगर, सोलापूर, नाशिक, शिर्डी, सातारा आदी जिल्ह्यांत जाणारी वाहने या रिंगरोडवरून जातील. पर्यायाने शहरातील वाहतूक कमी होईल.