Disadvantages of refined wheat flour, sugar, salt: *आरोग्याचे ‘पांढरे शत्रू-आपण अनेकदा जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खातो त्यांचा आरोग्याला किती फायदा होतो हे माहीत नसते. बहुतांश वेळा असे पदार्थ आरोग्यास अहितकारकच असतात. ते कसे माहिती करुन घ्या
कारण, त्यात साखर, मीठ, मैदा यांच्यासारखे घटक असतात. साखर, मीठ, मैदा यांना आरोग्यासाठी ‘पांढरे विष’ असे पूर्वी म्हटले जायचे. हे पदार्थ कसे अपाय करतात ते जाणून घेऊया…*
साखर, मीठ, मैदा, पांढरा तांदूळ आणि गायीचे पाश्चराईज्ड दूध हे पाचही पदार्थ पोषणाच्या दृष्टीने शून्य समजले जातात. त्यात पोषणमूल्य शून्य टक्के असतात. जीवनसत्त्व किंवा खनिजे यापैकी काहीही त्यातून मिळत नाही. वास्तविक, याच गोष्टी शरीराला आवश्यक असतात. अतिसेवन केल्याने हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच ठरतात. या पाचही घटकांचा रंग पांढरा असल्याने याला ‘पांढरे विष’ म्हटले जाते. साखरेला तर अन्नविरहित अन्न असे म्हटले जाते. कारण, त्यातून पोषक घटक काहीच मिळत नाहीत. त्यात जीवनसत्त्वे, खनिजेदेखील नसतात. साखरेचे अतिप्रमाणात सेवन केल्यास स्थूलता आणि मधुमेह यांचा धोका वाढतो. त्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका, कर्करोग, ब्रेनस्ट्रोकसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.
Refined | पांढरी साखर हानिकारक कशी? :
पांढर्या साखरेला रिफाईंड साखरही म्हटले जाते. ती शुद्ध करण्यासाठी सल्फर डायऑक्साईड, फॉस्फोरिक अॅसिड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि अॅक्टिव्हेटेड कार्बनचा वापर केला जातो. रिफायनिंग केल्यानंतर साखरेतील जीवनसत्त्व, खनिजे, प्रथिने, एन्झाईम्स आणि इतर फायदेशीर पोषक घटक नष्ट होतात. त्यात केवळ सुक्रोज शिल्लक राहते आणि सुक्रोजचे अतिप्रमाण शरीरासाठी घातकच असते.
आरोग्याच्या समस्या :
साखरेच्या अतिसेवनामुळे चयापचयाशी निगडित आजार जसे कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि उच्च रक्तदाब होतो. साखरेच्या अतिसेवनाने पोटावर चरबीचे थर जमा होतात. त्यामुळे स्थूलता, दात किडणे, मधुमेह आणि चयापचय क्रिया खराब होण्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचे अतिसेवन केल्यास शरीरातील कॅल्शियमचे पचन किवा चयापचय गडबडते. साखर, हाडे, रक्त आणि दात यांच्यातून कॅल्शियम शोषून घेतात. जास्त प्रमाणातील साखर पचनसंस्थेवर परिणाम करते. शरीरात ‘बी’ जीवनसत्त्वाची कमतरता होते आणि मज्जासंस्थेवरही त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो. रिफाईंड साखरेमुळे मेंदूमध्ये काही रासायनिक प्रक्रिया होतात, त्यामुळे सेरेटोनिन रसायनांचा स्राव वाहतो; आपल्याला हुशारी आल्यासारखे वाटते; पण काही वेळाने पुन्हा व्यक्तीला थकवा येतो, चिडचिड होते आणि नैराश्यही येते.
पर्याय कोणते? :
मधुमेहाने ग्रस्त लोकांनी तर साखरेचे सेवन न करता नैसर्गिक गोड पदार्थांचे म्हणजे फळांचे सेवन करावे. त्याशिवाय आरोग्य चांगले राखण्यासाठी साखरेऐवजी, गूळ, मध, खजूर, फळे, फळांचा रस आदींचे सेवन करावे. मध हा साखरेसाठी उत्तम पर्याय आहे. त्यात फ्रुक्टोज किंवा ग्लुकोज असले तर अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.
मैदा शरीराला हानिकारक कसा. :
मैदा गव्हापासूनच तयार केला जातो पण त्यावर प्रक्रिया Refined केली जाते त्यातच सर्व पोषक तत्त्व निघून जातात. त्याशिवाय मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये साठवण क्षमता वाढवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे शरीराचे नुकसान होते.
आरोग्याच्या समस्या :
ग्लू ऑफ गटस् म्हणतात. त्यात फायबर किंवा तंतुमय घटकांचे प्रमाण शून्य असते. त्यामुळे पचनसंस्था मंदावते, जड होते. पचन मंदावल्यामुळे चयापचयही मंदावते. त्यामुळे वजन वाढते, तणाव, डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्या वाढण्याची शक्यता वाढते. गव्हापासून मैदानिर्मितीच्या प्रक्रियेत चोकर वेगळे काढले जाते जे पचनासाठी आवश्यक असते. मैद्याचे सेवन केल्याने वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. त्यामुळेच अनेक आरोग्य समस्या जसे मधुमेह, उच्च रक्तदाब आदी होतात.
पर्याय काय? :
Refined मैदा कमी प्रमाणात कधी तरी खाऊ शकतो. त्याच्या अतिसेवनापासून बचाव करा. त्याऐवजी आरोग्यदायी काही पर्याय निवडावा. सामोसा खायचा तर कणकेचा वापर करावा. नान करण्यासाठी एक भाग गव्हाचे पीठ, एक भाग ज्वारीचे पीठ आणि एक भाग बाजरीचे पीठ मिसळावे. गव्हाच्या पीठाचा ब्रेड, नूडल्स आणि पास्ता, मॅक्रोनीचे सेवन करावे. हल्ली बाजारातही गव्हापासून केलेले हे सर्व पदार्थ मिळतात. गव्हाच्या पिठापासून बनवलेले काही पदार्थ काही काळ साठवूनही ठेवता येतात.
*मीठ शरीराला हानिकारक कसे : अनेकांना पदार्थात मीठ जास्त लागते. त्यांना खारट आणि मसालेदार पदार्थांची चव अधिक आवडते; पण या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मीठ किंवा टेबल सॉल्टचे सेवन प्रतिदिन 5 ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात करू नये.
Read Also: Blood Pressure अचानक कमी झालं तर घरीच कसा कराल उपचार? जाणून घ्या योग्य पद्धत आणि उपाय…
Refined | मिठाने वाढतो धोका :
सामान्यपणे शरीराचे कार्य योग्यरीतीने चालावे, यासाठी मिठाचे सेवन केले पाहिजे. मात्र, अतिप्रमाणात मिठाचे सेवन हे गंभीर आजारांना आमंत्रण देणारे असते; पण जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हायपर टेन्शन आदी समस्या निर्माण होतात. सतत हायपर टेन्शनचा त्रास होत असल्यास हृदयरोग, लकवा आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होण्याची शंका असते. तसेच जास्त मिठाचे सेवन केल्याने रक्तात लोहाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अॅसिडिटी वाढते आणि भूक लागली नसेल तरीही भूक लागल्याची जाणीव होत राहते. त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ले गेल्याने स्थूलता वाढते.
मिठाचे सेवन कसे कमी करावे : आहारात जास्त मीठ सेवन करू नये, खार्या पदार्थांचे सेवन कमी करावे, दह्यामध्ये मीठ घालू नये. तेलकट पदार्थ कमी सेवन करावेत. कच्चे सॅलड खाताना मीठ टाकू नये. पापड, चटणी आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन करावेत. ज्या व्यक्तींना हृदय, किडनी किंवा फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त असतात त्यांनी कमी सोडियम असलेले मीठ सेवन करावे किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Refined पांढरा भात किंवा तांदूळ :
पांढरा तांदूळ हादेखील रिफाईंड(Refined) धान्य किंवा रिफाईंड कार्ब यामध्ये मोडतो. रिफायनिंग करताना त्यात भुसा आणि ब्रान काढून टाकले जाते, त्यामुळे नैसर्गिक बी कॉम्प्लेक्स, लोह आणि तंतुमय पदार्थ बाहेर टाकले जातात. पांढरा तांदूळ आकर्षक होण्यासाठी जे पॉलिश केले जाते त्यामुळे तांदळातील पोषक घटक कमी होतात.
Read Aslo: शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?
आरोग्य समस्या :
पांढर्या तांदळाच्या दाण्यात एन्डोस्पर्म असतात जे शुद्ध स्टार्च असते. वैद्यकीय विश्वात स्टार्च हानिकारक समजले जाते. कारण, त्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते. सतत सेवन केल्यास रक्तात साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढवते.
पर्याय कोणता :
शक्य असल्यास ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदूळ सेवन करावा. त्यात फायबर आणि इतर पोषक घटक यांचे प्रमाण जास्त असते. हातसडीच्या तांदळावर फोलकट किंवा ब्रान तसेच असते. हा तंतुमय पदार्थांचा उत्तम स्रोत आहे. त्यात बी 12 जीवनसत्त्व, खनिजे आणि अमिनो अॅसिडस् असतात.
प्रिन्सटन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात असा निष्कर्ष निघाला की, साखरेचे सेवन केल्याने जी रसायने स्रवतात ती मेंदूतील मार्गाने पुढे जातात ज्या मार्गाने हेरोईनमधील रसायने जातात. कर्करोगग्रस्त पेशी जिवंत राहण्यासाठी आणि विकास होण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात ग्लुकोजची आवश्यकता असते. ते साखरेपासून मिळते. 2009 सालामध्ये शिकागो विद्यापीठात झालेल्या एका संशोधनानुसार साखरेचे सेवन आणि पेशींची वयवृद्धी यांचा थेट संबंध आहे. ज्या व्यक्ती साखरेचे अतिसेवन करतात त्यांच्या शरीरातीलच नव्हे, तर मेंदूच्या पेशीदेखील लवकर म्हातार्या होतात. ज्या व्यक्ती आठवड्यातून पाच वेळा पांढरा तांदूळ सेवन करतात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता 17 टक्क्यांनी वाढते.