Shri Sant Gajanan Maharaj Shegaon Anand Sagar Spiritual Opened: आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सुरू झाले

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाकरता भक्तांची गर्दी नेहमीच असते. येथे आल्यावर श्रींच्या दर्शनानंतर भक्तगण आनंद सागर येथे जात असे. श्री संत गजानन महाराज संस्थान कडून २००१ साली धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकर व उभारणी करण्यात आली होती.
Shri Sant Gajanan Maharaj Shegaon Anand Sagar Spiritual Opened: आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सुरू झाले

Shri Sant Gajanan Maharaj Shegaon Anand Sagar Spiritual Opened: आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सुरू झाले: शेगावमधील आनंद सागर प्रकल्पातील बंद असलेले अध्यात्मिक केंद्र बुधवारी ४ मार्चपासून सुरू करण्यात आले आहे.

यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Shri Sant Gajanan Maharaj Shegaon Anand Sagar Spiritual Opened: आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सुरू झाले

बुलडाणा : शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. शेगावमधील आनंद सागर प्रकल्पातील बंद असलेले अध्यात्मिक केंद्र उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेगावतील मंदिराप्रमाणेच आनंद सागर येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येत असे. यामुळे येथे पर्यटन वाढलं होतं.

पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थांनी आनंद सागर प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळी १० वाजेपासून आनंद सागर मधील अध्यात्मिक केंद्र भाविकांकरता खुले केले आहे, याची वार्ता सर्वत्र पसरल्यानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाविकांनी व्यक्त केला आनंद

मागील काही दिवसांपासून आनंद सागर सुरू होणार असे व्हाट्सअप मेसेज आणि माध्यमातून बातम्या येत होत्या.

आता मंदिराने सविस्तरपणे याचा खुलासा करत बुधवार दिनांक ४ मे सकाळी १० वाजल्यापासून आनंद सागर मधील फक्त आध्यात्मिक केंद्र सुरू आहे.

काय बंद राहणार?

Shri Sant Gajanan Maharaj Shegaon Anand Sagar Spiritual Opened: आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सुरू झाले
  • आनंद सागर मधील – टॉय ट्रेन, बोटिंगइतर मनोरंजनाचे उपक्रम बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • तरीदेखील बहुप्रतीक्षित आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र उद्यापासून सुरू होणार असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

मंदिराचा उत्तम नियोजन कारभार

  • शिस्त आणि स्वच्छता, तसेच नियोजन कारभाराचे शेगाव संस्थानाने एक उदाहरण ठेवले आहे.
  • त्याचाच एक भाग पुन्हा एकदा उद्यापासून सुरू होणाऱ्या आनंद सागर मधील अध्यात्मिक केंद्राकडे पाहिला जातो.
  • अनेक माध्यमातून आणि व्हाट्सअपद्वारे समाज माध्यमातून आलेल्या बातम्यांबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
  • मात्र जेव्हा मंदिर प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्णत्वास आली तेव्हाच अखेर मंदिर प्रशासनाने रीतसर एक सूचनाफलक भाविकांकरता जाहीर रित्या लावला. त्यानुसार उद्यापासून आनंद सागर अध्यात्मिक केंद्र अखेर खुले केले आहे हे विशेष.
Shri Sant Gajanan Maharaj Shegaon Anand Sagar Spiritual Opened: आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सुरू झाले

श्री संत गजानन महाराज संस्थान कडून २००१ साली धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची २०० एकर व उभारणी करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा :-

Amarnath Temple

Quantum Innovation

Leave a Reply