Sony Bravia Series चा नवीन स्मार्ट टीव्ही लाँच मिळवा घसघशीत सूट, पाहा खास फीचर्स


  • Sony Bravia Series | Sony SmartTV | Sony Bravia | Sony Bravia X70L
Sony bravia x70L

Sony Bravia Series X70L Smart TV : सोनी कंपनीने दोन व्हेरियंट्सचे स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. या टीव्ही मुळे घरातच थिएटरसारखी मजा मिळू शकणार आहे. या टीव्हीची किंमत किती आणि यात कोणते फीचर्स मिळणार, सविस्तर जाणून घ्या.

Sony ने भारतीय बाजारात Sony Bravia X70L Smart TV ला लाँच केले आहे. नवीन टीव्हीत X1 4K प्रोसेसर, लाइव कलर टेक्नोलॉजी, X-रिएलिटी प्रो आणि खूप काही खास फीचर्स दिले आहेत. हा टीव्ही मिड रेंज टीव्ही मार्केटमध्ये अन्य स्मार्ट टीव्हीशी स्पर्धा करेल. कंपनीच्या माहितीनुसार, नेक्स्ट जनरेशनची टी्ही सीरीज बेस्ट इन क्लास इंटरटेनमेंट आणि ट्रू-लाइफ व्यूइंग एक्सपीरियंस देण्यासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. या ठिकाणी Sony Bravia X70L Smart TV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स संबंधी माहिती देत आहोत.

Discount Offers :8 gb ram चा लॅपटॉप मिळवा 10 हजारात Infinix Y1 Plus Neo

Sony Bravia X70L चे फीचर्स

Sony Bravia X70L मध्ये एक्स1 4के पिक्चर प्रोसेसर दिले आहे. जे नॉइजला कमी करणे आणि डिटेल्सला बूस्ट करण्यासाठी एडवांस एल्गोरिद्म वर काम करते. ४के टीव्ही, ४के एक्स रियलिटी प्रो टेक्नोलॉजी देते. जे फुल एचडी आणि २ के कंटेटला ४ के करू शकते. याशिवाय, यात मोशन फ्लो एक्सआर दिले आहे. जे अतिरिक्त फ्रेम देते. जे स्मूद आणि फास्ट मूव्हींग सीन देते. या टीव्हीत स्लिम बेजेल्स आणि स्लिमलाइन स्टँड दिले आहे.

Sony Bravia X70L ऑपरेटिंग सिस्टमसाठी गुगल टीव्ही ओएस वर काम करते. अॅपल होम किट आणि एअर प्लेचा सपोर्ट करते. ऑडियो मध्ये Sony Bravia X70L टीव्हीत २० वॉट साउंड आउटपूट देते. हा डॉल्बी ऑडियो सोबत येते. हा टीव्ही क्लियर फेज टेक्नोलॉजी सोबत पॉवरफुल कंम्प्यूटरचा वापर करून हे चेक करू शकता की, स्पीकरचा परफॉर्मन्स कसा करीत आहे. टीव्ही रिमोट सोबत व्हाइस एनेबल फीचर्स दिले आहेत. यासोबत ६ हॉटकीज दिली आहे. जे अमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिज्ने प्लस हॉटस्टार, सोनी लिव आणि अन्यचा सपोर्ट करते. याशिवाय, सोनीचा हा टीव्ही एक्स प्रोटेक्शन प्रो टेक्नोलॉजी सोबत येतो. जो डस्ट आणि ह्यूमिडिटी प्रोटेक्शन आणि लाईटनिंग स्ट्राइक्स आणि पॉवर कट पासून सेफ्टी देते.

Sony Bravia X70L ची किंमत

Sony Bravia X70L टीव्ही डिस्प्लेमध्ये दोन साइजमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. Sony Bravia X70L च्या ४३ इंच व्हेरियंटची कंमत ५९ हजार ९०० रुपये आहे. Sony Bravia X70L च्या ५० इंच व्हेरियंटची किंमत ७४ हजार ९०० रुपये आहे. Sony Bravia X70L सीरीज विक्रीसाठी सोनी सेंटर्स, मेन इलेक्ट्रॉनिक्स स्टोर आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध केले जाणार आहे.

Leave a Reply