State NA Plotting New Update 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासा एनए(NA) भूखंडांच्या स्वतंत्र परवानगीची पद्धत संपुष्टात !

पहिले कृषि जमीन नसलेल्या (बिगरशेती) Non-Agricultural जमिनीवर कोणतेही बांधकाम करणे हे बेकायदेशीर ठरविले जात असे. तसेच, एनए (NA) नसलेल्या जमिनींवर घरे बांधण्यासाठी बँकाही कर्ज देत नसत. त्यामुळे, एनए (NA) प्रक्रियेला कमालीचे महत्त्व आले हाेते.
State NA Plotting New Update 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासा एनए(NA) भूखंडांच्या स्वतंत्र परवानगीची पद्धत संपुष्टात !

State NA Plotting New Update 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासा एनए(NA) भूखंडांच्या स्वतंत्र परवानगीची पद्धत संपुष्टात ! : बांधकामांसाठी भूखंड अकृषक/बिगरशेती करण्याच्या व्यवहारात गेली अनेक वर्षे अर्थपूर्ण व्यवहार होऊन अनेक लोक तरसावले. मात्र, यापुढे स्वतंत्ररीत्या अकृषक (बिगरशेती) परवानगीची आवश्यकता नसेल, असा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेऊन मोठा दिलासा दिला आहे.

नॉन ॲग्रिकल्चर (NA Plotting) का महत्वाची ?

शेतजमिनीवर म्हणजे कृषक/कृषि जमिनीवर कोणतेही बांधकाम करायचे असेल तर, त्या जमिनीचा कृषक वापर हा अकृषक/बिगरशेती करणे म्हणजे ती जमीन एनए (नॉन ॲग्रिकल्चर) करणे.

जमीन एनए करवून देण्यासाठी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये आजवर अडवणूक व्हायची. बिगरशेती जमिनीवर कोणतेही बांधकाम करणे हे बेकायदेशीर ठरविले जात असे तसेच, एनए नसलेल्या जमिनींवर घरे बांधण्यासाठी बँकाही कर्ज देत नसत.

त्यामुळे एनए प्रक्रियेला कमालीचे महत्त्व आले हाेते. एनए करून देण्याच्या मोबदल्यात होणारी खाबूगिरी आजवर बरीच वर्षे जागोजागी सुरू राहिली.

कृषक जमीन अकृषक करण्यासाठीचा कर वसूल करून बांधकाम परवानगीसोबतच अकृषक वापराची सनद यापुढे दिली जाणार आहे. त्यामुळे एनएसाठी महसूल खात्याचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही.

आणखी माहितीसाठी Official WebsiteNon-Agricultural Plotting Permission

NA प्लॉट साठी ऑनलाइन प्रणाली कशी असणार ?

एनएसाठी बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम या ऑनलाइन प्रणालीतूनच अर्ज करावा लागणार आहे. शुल्कही ऑनलाइनच भरावे लागणार आहे.

ज्या जमिनी प्रस्तावित किंवा प्रचलित विकास आराखड्यात बांधकाम परवानगी प्राप्त असतील, गावाच्या हद्दीच्या २०० मीटरच्या आत असतील अथवा औद्योगिक प्रयोजनांसाठी असतील त्यांना वेगळ्या एनए मंजुरीची गरज लागणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसह हा निर्णय पीएमआरडीएलाही लागू होणार आहे.

State NA Plotting New Update 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासा नए(NA) भूखंडांच्या स्वतंत्र परवानगीची पद्धत संपुष्टात !
State NA Plotting New Update 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासा एनए(NA) भूखंडांच्या स्वतंत्र परवानगीची पद्धत संपुष्टात !

NA plotting साठी किती वेळ लागणार ?

एनए (NA) साठी वर्षानुवर्षे लोकांना त्रास होत असे. पूर्वी NA Plotting साठी किमान ६ महिन्यांचा कालावधी लागत होता.

त्यानंतर, नकाशे मंजुरीसाठीही किमान ६ महिने, पर्यावरण मंजुरी ३ महिने व खोदकामाच्या परवानगीसाठी किमान ३ महीने असा कालावधी लागत होता.

एकूण दीड वर्षांचा कालावधी लागत होता. मात्र, आता नव्या निर्णयामुळे या परवानग्या लवकर मिळणे शक्य होईल.

राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री यांनी काय सांगितले ?

वर्षानुवर्षे लोकांना होणार त्रास कायमचा बंद व्हावा, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्राला या निर्णयामुळे गती मिळेल व पारदर्शकतादेखील येईल.

एनए (NA) साठीची नोंदणी डिजिटल – ग्राहकांना काय फायदा ?

रणजीत नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई, पुणे – एनए (NA) साठीची नोंदणी डिजिटल असणार आहे. या नोंदणीसाठी विकासकांना आणखी वेगळ्या ठिकाणी जावे लागणार नाही. आता व्यावसायिकांना प्रकल्पाला लागणारा वेळ कमी झाल्याने ग्राहकांना मिळणाऱ्या किमतीमध्येदेखील निश्चितच फरक पडणार आहे.

हे सुद्धा वाचा :-

2023 Google Opportunity Career In Google

Leave a Reply