Wrong food combination :विरुध्द आहार टाळा – निरोगी राहा.

wrong food combinations\wrong food combination\wrong food combinations as per ayurveda\food combinations to avoid\food combinations\bad food combinations\correct food combination tips\wrong combination of food\wrong food combination in hindi\wrong combination of food ayurveda\wrong food combinations in tamil\weird food combinations\bad food combination\food combination\wrong food combination in tamil\wrong combination of indian food

आयुर्वेदानुसार अनेक आजारांचे कारण हे “विरुध्द आहार” सांगितले आहे. असा आहार जो नीट पचत नाही आणि तसाच शरीरात साठून राहतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा शरीरातील इतर घटकांच्यामध्ये मिक्स होऊन व्याधी निर्माण करतो तो विरुध्द आहार आहे. आपल्या रोजच्या आहारातील काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत.

  • दूध आणि कोणतेही फळं एकत्र करून खाणे. जसे की milk shake, केळीची शिक्रण, fruit ice cream, fruit salad हे कधीही खाऊ नये.
  • दही दूध भात एकत्र करून खाणे चुकीचे आहे. एकतर दूध भात खा किंवा दही भात. कोणतीही आंबट/खारट गोष्ट दुधात एकत्र करू नये.
  • दूध लोणचे भात
  • कडु पदार्थात दूध घालू नये. काही भाज्या जसे की मेथी मटर मलाई यात क्रीम आणि दूध असते. तसा एकत्र संयोग चुकीचा आहे.
  • पंजाबी gravy च्या भाज्या ज्यात टोमॅटो आणि cream एकत्र केलेले असते.
  • गरम पाणी आणि मध
  • दूध आणि मासे एकत्र करून खाऊ नयेत. किंवा मासे खाल्ल्यानंतर दुध पिऊ नये
  • cornflakes आणि दूध

विशेषत त्वचा विकार, ज्यांचा कोठा खूप जड आहे, रोजच्या रोज पोट साफ होत नाही, urticaria म्हणजे अंगावर पित्त उठणे, Rheumatoid Arthritis (आमवात), अशा पेशंट नी strictly विरुद्ध आहार करू नये. अन्यथा किती ही औषधे घेतली तरी त्रास कमी होत नाही.

रोजच्या प्रॅक्टिस मध्ये अशा चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयी मुळे झालेले नुकसान आम्ही नेहमी अनुभवत असतो. कधीतरी एखाद्यावेळी खाणे गोष्ट वेगळी पण सतत असा विरुध्द आहार घेणे शरीराला नक्कीच हानिकारक आहे.

नुसतं औषधांच्या मागे न लागता खाण्यापिण्यात काय चुकीचे आहे हे समजून घ्या म्हणजे आजारापासून लवकर सुटका होईल. जीभेवर जितका ताबा ठेवाल तितकं निरोगी राहाल. नाहीतर औषधे,तपासण्या आणि डॉक्टर यांच्या दुष्ट चक्रात अडकून पडाल.

Leave a Reply